पोलीस ठाण्याबाहेर मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:05 IST2019-08-05T23:05:19+5:302019-08-05T23:05:23+5:30

‘मी वसईकर अभियान’ : पालघर पोलिसांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्याचे प्रकरण

Silent movement outside the police station | पोलीस ठाण्याबाहेर मूक आंदोलन

पोलीस ठाण्याबाहेर मूक आंदोलन

वसई : ‘मी वसईकर अभियाना’च्या आंदोलकांनी भर पावसात माणिकपूर पोलीस ठाण्याबाहेर दिवसभर उभे राहून हातात महात्मा गांधीजीची प्रतिमा घेत शुक्रवारी एक मूक आंदोलन केले.

बहुचर्चित ११ कोटी रुपयांच्या दफनभूमीच्या कामातील कथित घोटाळ्याप्रकरणी वसई-विरार महापालिका अधिकारी आणि पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाºयावर गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाºया पोलिसांविरोधात वसईतील रस्त्यावर पालघर पोलिसांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.

या प्रकरणी ‘मी वसईकर अभियाना’च्या ३५ ते ४० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग झाल्याप्रकरणी विविध कलमाच्या आधारे गुन्हेही दाखल करण्यात आले. दरम्यान, याच दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी ‘मी वसईकर अभियाना’च्या काही निवडक पदाधिकाºयांना माणिकपूर पोलीस निरीक्षक आणि त्यांचे तपास अधिकारी यांनी १ आॅगस्ट रोजी सकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी मिरवणुकीत वापरलेली पालखीही घेऊन येण्यास सांगितले. आंदोलकांनी ती पालखी पोलीस ठाण्यात आणली असता, पोलिसांनी त्या पालखीला आणि आपल्याला इथे बसता येणार नाही, असे बजावले. त्याचवेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी मिलिंद खानोलकरसहीत आंदोलकांना अतिशय गैर व अपमानास्पद वागणूक देत तिथून हाकलून लावले. त्याचाच निषेध म्हणून हे मूक आंदोलन केले.

वसईमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. पण कोणत्याही पोलीस निरीक्षकाने आम्हास अशी अपमानास्पद वागणूक दिली नाही, जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहणार. - मिलिंद खानोलकर, अध्यक्ष, मी वसईकर अभियान

या पोलीस विरोधी आंदोलनाची मी माहिती घेतो. मात्र कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा असेल किंवा सदर प्रकरण महापालिका संबंधित असेल तर त्यासाठी तक्रारदार आंदोलकांनी नगरविकास खाते, त्यांचे उच्चस्तरीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली पाहिजे, सरकारला कोण दोषी आहे ते चौकशीत आढळून आले की आपोआप दोषींवर नियमानुसार कारवाई होईल, तरीही या आंदोलनाची जातीने लक्ष टाकीत माहिती घेतो.
- दीपक केसरकर,
गृहराज्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य

Web Title: Silent movement outside the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.