वसईतील 35 गावे वगळण्याच्या निर्णयाच्या आठवणीसाठी मी वसईकर अभियानाचे मुखपट्टी मौन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 19:00 IST2020-10-02T18:54:37+5:302020-10-02T19:00:55+5:30
Vasai News : गांधी जयंतीचं औचित्य साधून या कार्यक्रमाची सुरुवात वसईत झाली.

वसईतील 35 गावे वगळण्याच्या निर्णयाच्या आठवणीसाठी मी वसईकर अभियानाचे मुखपट्टी मौन आंदोलन
आशिष राणे
वसई - वसईत 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती निमित्त मी वसईकर अभियानाने वसई विरार महानगरपालिकेतून 35 गावे वगळण्यासाठी ग्राम स्वराज्य अभियान राबवित तोंडाला मुखपट्टी बांधून मौन धारण करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वसईकरांना महापालिकेतून 35 गावे वगळण्यासाठी दिलेल्या शब्दाची स्मरणांजली देण्यात आली.
2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून या कार्यक्रमाची सुरुवात वसईत झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधीजी यांना पुष्प अर्पण करण्यात आले. मुखपट्टी मौन या कार्यक्रमाला मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, मार्गदर्शक विजयजी पाटील,मार्गदर्शक विनायकजी निकम, कार्याध्यक्ष वकील सुमित डोंगरे, सचिव वकील अनिल चव्हाण, नितिन म्हात्रे, किरण शिंदे,व 35 गावाचे प्रतिनिधी उपस्थित होते.