वसई तालुक्यातील सिग्नलची बाईकर्सकडून ऐशीतैशी
By Admin | Updated: May 7, 2017 01:23 IST2017-05-07T01:23:46+5:302017-05-07T01:23:46+5:30
वसई तालुक्यातील सिग्नलचे नियम न पाळता दुचाकीस्वारांकडून सिग्नल दररोज तोडले जात आहेत. त्यात पोलीसांचाही

वसई तालुक्यातील सिग्नलची बाईकर्सकडून ऐशीतैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई तालुक्यातील सिग्नलचे नियम न पाळता दुचाकीस्वारांकडून सिग्नल दररोज तोडले जात आहेत. त्यात पोलीसांचाही पुढाकार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या सिग्नलमुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास आणि बेदरकरापणे वाहन चालविणाऱ्यांंवर अंकुश ठेवणस मदत होईल. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही आटोक्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी वसई अंबाडी नाका, शंभर फुटी रोड, पार्वती क्रॉस या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यरत झाली होती. या यंत्रणेमुळे वाहतूक पोलीसांवरील ताण कमी होईल, तसेच धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्यांवरही अंकुश बसण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पादचारी सुखावले होते. मात्र, त्यांचा हा आनंद क्षणिकच ठरला आहे. सिग्नल लागल्यानंतर तो खुला होणची वाट न पाहता, उजव्या बाजुने (राँग साईडने ) आपली वाहने जोरात हाकण्याचा प्रकार दुचाकीस्वारांकडून केला जात आहे.
यात दुचाकीस्वारांप्रमाणे पोलीसही आघाडीवर आहेत. अनेक पोलीस राँग साईडने जाताना आपली ओळख पटु ने यासाठी हेल्मेटचा वपर करीत आहेत. तर काही पोलीस हेल्मेटचा वापरही न करता राँग साईडने जाऊन वाहतुकीचा नियम आणि सिग्नल पायदळी तुडवताना दिसून येत आहेत.
आठ सिग्नल झाले सुरू
१ मे पासून वसई तालुक्यातील रेंजनाका गोखिवरे, चंदननाका आचोळे, टाकीनाका तुळींज, पाटणकर पार्क नालासोपारा पश्चिम जकातनाका विरार पश्चिम ओल्ड विवा कॉलेज, नारंगी जंक्शन आणि आर.जे.जंक्शन फुलपाडा या आठ ठिकाणी सिग्नल सुरु करण्यात आले.