Signal signal from Parvati Cross Chowk of Vasai! | वसईच्या पार्वती क्रॉस चौकातील सिग्नल बंदच
वसईच्या पार्वती क्रॉस चौकातील सिग्नल बंदच

वसई : वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील आठ महत्त्वाच्या सिग्नलपैकी स्टेशन जवळील पार्वती क्रॉस या मुख्य चौकातील चारही दिशेचे सिग्नल चार दिवसांपासून बंद असल्याने येथे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. यामुळे चालकांसह नागरिकही त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, या मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा काही तांत्रिक कारणाने बंद असली तरी वाहतुकीचे शहरातील नियोजन व वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या वसई वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संपत पाटील आणि त्यांचे कर्तव्यावरील वाहतूक पोलीस सतत गैरहजर असल्याने अजूनच समस्या निर्माण होत आहेत. शहरातील वाहतुकीचा मोठा गंभीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने चार वर्षांपूर्वी महापालिकेने पालिका हद्दीत पहिल्या फेजमध्ये वसई शहरातील आठ मुख्य ठिकाणी स्वयंचिलत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली.
तद्नंतर पालिकेने या सर्व आठही सिग्नल यंत्रणाचे नियोजन वसई वाहतूक शाखेला देऊ केले, मात्र अधूनमधून वसईत बहुतांशी ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडून कधी ‘पिवळा’ तर कधी ‘स्टॉप’ असा सिग्नल सुरु असतो. शहरातील मुख्य चौकातील अशा लुकलुकणाऱ्या बंद सिग्नलचा फटका वाहन चालकांना व नागरिकांना बसतो. दरम्यान, चार दिवसांपासून वसईतील पार्वती क्रॉस या मुख्य चौकातील चार ही दिशेचे सिग्नल बंद असून हे सिग्नल केवळ पिवळा व मध्येच लाल, हिरवा तर मध्ये ‘स्टॉप’ असे लुकलूक करीत वाहनचालकांना गोंधळात पाडत आहेत.
पार्वती क्रॉस या मुख्य चौकात एकही वाहतूक पोलीस ड्युटीवर दिसत नाही. या प्रकरणी वाहतूक शाखेस संपर्क केला तर वाहतूक शाखा पालिकेच्या सिग्नल नियोजन व देखभालीची ठेकेदार कंपनी अंतर्गत असणाºया इलेक्ट्रिक विभागाकडे बोट करते. त्यामुळे या प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
>सिग्नल असून खोळंबा, वाहतूक पोलीस गायब?
वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील मुख्य चौकात, रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. सिग्नल बंद असले तरीही वाहतूक पोलीस आपल्या चौकीतच आराम करतात, प्रसंगी तक्र ारी आल्या तरीही ते केवळ रस्त्याच्या कडेला चौकात थांबतात. पण, त्यांच्याकडून नियोजन होताना दिसत नाही.
बंद सिग्नलसंदर्भात पोलिसांना विचारल्यानंतर ते आम्ही पालिकेला पत्र दिल्याचे सांगतात. महापालिकेत तर सावळा गोंधळच आहे. त्यांच्याकडे दुरु स्ती-देखभाल करण्याची यंत्रणाच नाही. त्यामुळे ते ठेकेदार कंपनीला कळवतो असे सांगतात. एकूणच काय या दोन्ही यंत्रणांमधील त्रोटक संपर्क आणि नियोजनाचा अभाव पाहता याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांच्या वाढत्या संख्येवर होताना दिसतो आहे.
>बहुतांशी नागरिक
शिस्त पाळत नाहीत
वन-वे, चुकीच्या दिशेने ये-जा करणे, झेब्रा क्र ॉस पट्ट्याच्या आत सिग्नलला थांबणे. हिरवा दिवा लावण्याच्या आतच वाहनचालक पुढे जातात. असे न करता वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. शॉर्टकटचा मार्ग म्हणून चुकीच्या दिशेने ये-जा करतात. वन-वे चा अवलंब होत नाही. अशा वाहनचालकांवर दंडात्मक अथवा गाडी जप्त करण्याची कारवाई केल्याशिवाय जरब बसणार नाही.
>सिग्नल बंद आहेत, याची कल्पना आहे. मात्र रविवारी माझी ठाणे ग्रामीण पोलीस दलात बदली झाली असून माझ्या जागी आलेल्या वाहतूक निरीक्षक यांना सूचित करतोकी, बंद सिग्नल सुरू करा आणि त्याजागी वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा. - संपतराव पाटील, वसई वाहतूक पोलीस निरीक्षक,
वसई वाहतूक शाखा,वसई
>मुख्य रस्त्यावर पार्वती क्र ॉस चौक येथील सर्व सिग्नल बंद आहेत, त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम व नियोजन करण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमली आहे. तत्काळ दुरु स्तीबाबत तसे निर्देश देतो.
- गिलसंन घोनसालवीस, सहायक आयुक्त,
एच प्रभाग समिती नवघर माणिकपूर विभागीय कार्यालय


Web Title: Signal signal from Parvati Cross Chowk of Vasai!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.