अखेर साइडपट्ट्यांचे काम झाले सुरू

By Admin | Updated: April 24, 2017 23:45 IST2017-04-24T23:45:24+5:302017-04-24T23:45:24+5:30

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत चालू असलेल्या कासटवाडी बायपास रोडचे रूंदीकरण व मजबुतीकरण करतांना

The sidewalks are finally going to work | अखेर साइडपट्ट्यांचे काम झाले सुरू

अखेर साइडपट्ट्यांचे काम झाले सुरू

जव्हार : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत चालू असलेल्या कासटवाडी बायपास रोडचे रूंदीकरण व मजबुतीकरण करतांना ठेकेदाराने अर्धवट ठेवलेले साईडपट्ट्यांचे काम लोकमतमधील वृत्तामुळे सुरू झाले आहे. ठिकठिकाणी खडी पसरवून गेल्या महिन्याभरापासून हे काम बंद केले होते. यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनांचे शेकडो अपघात या ठिकाणी झाले.
ते काम शुक्रवारपासुन सुरू करण्यात आलेले आहे. बायपास रोडचे रूंदीकरण व मजबुतीकरण करण्याकरीता तीन टप्प्यात कामे वाटप करण्यात आले होते. साकी नाका ते एस.टी. स्टॅन्ड व एस.टी. स्टॅन्ड ते शिवनेरी धाबा, जुनीजव्हार ते कासटवाडी डहाणू फाटा पर्यत एकूण ६ कोटी ७० लाखाचे असून यातील पहिली दोन कामे पूर्ण आहेत. मात्र, जुनीजव्हार ते डहाणू फाटा रोडचे एकुण ४ किलोमीटरचे काम अर्धवट सोडून फक्त साईड पट्टी खोदून आजूबाजुला खडी पसरवली होती.
(वार्ताहर)

Web Title: The sidewalks are finally going to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.