बाजारपेठेत शुकशुकाट
By Admin | Updated: November 10, 2016 02:53 IST2016-11-10T02:53:28+5:302016-11-10T02:53:28+5:30
केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करून आर्थिक आणीबाणी लादल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट
डहाणू/बोर्डी : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करून आर्थिक आणीबाणी लादल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या निर्णयानंतर सुरू झालेले सोशलमीडियावरचे मेसेज वॉर दिवसभर सुरू होते. प्रत्यक्षात पर्यटन, बाजार, वाहतूक तसेच रोजंदारी या मध्ये कमालीची अस्वस्थता दिसून आली. पेट्रोल पंप वगळता सर्वच बाजारावर मंदीचे सावट पसरले होते.
केंद्र सरकारने देशहितासाठी पाचशे आणि हजार रु पयांच्या चलनी नोटा बंद केल्याचे सांगून देशबांधवांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मात्र या निर्णयामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र डहाणू तालुक्यात पाहावयास मिळाले. रात्री उशिरापर्यन्त नोटा बंद केल्याचा निर्णय अफवा नसल्याची खात्री केल्यानंतर बुधवारी पहाटेपासून अनेकांनी किराणामालाचे दुकान, भाजी मार्केट, दूधवाला, रिक्षाचालक आदि. ठिकाणी बंदी आलेल्या नोटा वटवून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसारमाध्यमामुळे सजगता आल्याने अशा नोटा घेण्यास नकार देण्यात आला. दिवसभर बँक, एटीएम मशीन बंद असतांनाही नागरिक संपर्क साधत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले.
डहाणू आणि बोर्डी या पर्यटन स्थळी आलेल्या पर्यटकांचे हाल झाले. प्लास्टीक करन्सीचा फायदा ग्रामीण भागात न झाल्याने परगावतील पर्यटकांनी घराची वाट धरली. त्याचा परिणाम हॉटेल तसेच ग्रामीण आणि कृषी पर्यटन केंद्रावर दिसून आला. ग्राहकांकडे सुट्टे पैसे असल्याची खात्री करूनच सेवा देण्याची हमी रिक्षाचालक, दुकानदार आणि घाऊक बाजारातील व्यापारी घेत होते. त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला असून मजूरवर्गाला रोजंदारीचे पैसे देण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. मजुरी न मिळाल्याने शेतमजुरांनी कामावर येणे थांबवल्यास नाशवंत कृषी मालाचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान तालुक्यातील विविध पेट्रोल पंपावर पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. मात्र नोटांच्या बदल्यात तेवढ्याच किमतीचे पेट्रोल घेण्याचे बंधन असल्याने फक्त या व्यवसायावर तेजीची झळाळी दिसून आली. मात्र नोटा स्वीकारण्यासह संबंधितांचे ओळखपत्र, संपर्क क्र मांक नोंदवताना पेट्रोल पंपचालकांची दमछाक झाली. दहा, पन्नास आणि शंभर रु पयांच्या नोटा असणाऱ्यांकडे कुतुहलाने पाहण्यात येत होते.
संधीसाधूंन्भ् पाचशे तसेच हजारच्या नोटैमागे शंभर रुपये
कमी देत सुट्या पैशांचा व्यवहार करून आर्थिक फायदा
उठवला. एकंदरीत आर्थिक उलाढालीवर मंदीचे सावट दिसून आले. (वार्ताहर)