तारापूरच्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:57 IST2018-09-22T02:57:56+5:302018-09-22T02:57:58+5:30
मोठ्या प्रमाणात घातक घनकचरा व इतर रसायने अनधिकृतपणे कारखान्याच्या आवारात साठविणाऱ्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

तारापूरच्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस
- पंकज राऊत
बोईसर : मोठ्या प्रमाणात घातक घनकचरा व इतर रसायने अनधिकृतपणे कारखान्याच्या आवारात साठविणाऱ्या चार उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी अचानक केलेल्या पहाणीत ही बाब उघड झाली होती.
तारापूर एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यातून निघालेला घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविणे बंधनकारक असतांनाही खर्च वाचविण्यासाठी तो मुख्य रस्त्याच्या कडेला वा सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे टाकला जात असल्याच्या घटना मागील महिन्यांमध्ये लोकमतने उघडकीस आणल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा खडबडून जागी झाली व तिने घातक घनकचºयाचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. तीमध्ये तारापूर येथील काही कारखान्यांची तपासणी केली असता सपना डिटर्जंट, मेशा फार्मा , निरव सिल्क व इस्टमन केमिकल्स या कारखान्यांपैकी काही मध्ये घातक घन कचरा तर एका कारखान्यात घातक रसायन साठवून ठेवल्याचे समोर आले.
या पैकी सपना , मेशा या दोन कारखान्यात मोठया प्रमाणात घनकचरा आढळून आला असून तो त्यांना मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कडे विल्हेवाटी करीता पाठविण्यास म.प्र.नि. मंडळाने सांगितले असून इतर कारखान्यांची पारदर्शकपणे तपासणी करून घातक घनकचरा साठविणाºया कारखान्यांवरकठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
>तपासणीत सातत्य हवे
जोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ तपासणीत सातत्य ठेवत नाही व तीमध्ये दोषी आढळणाºयांवर कठोर कारवाई करीत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही. नाटकी कारवाई होत असल्याने तिचा धाक कारखान्यांना उरलेला नाही अशी चर्चा खुलेआम सुरू आहे.