शिवसैनिकांनी केली तलाव सफाई

By Admin | Updated: June 20, 2016 01:54 IST2016-06-20T01:54:06+5:302016-06-20T01:54:06+5:30

सेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने तलावाची साफसफाई करून शिवसेनेने नवा आदर्श निर्माण केला आहे. शहरात प्रवेश करतानाच प्रथम दृष्टीक्षेपात येणाऱ्या या तलावा सभोवती

Shivsainiks performed karna pool cleaning | शिवसैनिकांनी केली तलाव सफाई

शिवसैनिकांनी केली तलाव सफाई

मोखाडा : सेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने तलावाची साफसफाई करून शिवसेनेने नवा आदर्श निर्माण केला आहे.
शहरात प्रवेश करतानाच प्रथम दृष्टीक्षेपात येणाऱ्या या तलावा सभोवती व आतील बाजूने घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरलेली असल्याने या तलावाचे सौंदर्य विद्रुप झालेले आहे.तसेच हा तलाव मोखाडावासीयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे दरवर्षी पारंपारीक पद्धतीने या तलावात गणेश व दुर्गा मातेचे विसर्जन केले जाते संध्याकाळच्या वेळी या तलावाच्या कठड्यावर व्यापारी वर्ग तरुण कर्मचारी यांची मोठी गर्दी असते यामुळे हा तलाव मोखाडावासियांचा विरंगुळा आहे असे असतान देखील याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आज सकाळी या तलावाची आणि परीसराची साफसफाई करून
शिवसैनिकांनी मोठी समाजसेवा केली आहे. यावेळी जि. प. सदस्य प्रकाश निकम तालुका प्रमुख रविंद्र कटीलकर व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Shivsainiks performed karna pool cleaning