शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धक्कादायक! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कार गुजरातच्या तलावातून बाहेर काढली; घातपात झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:06 IST

डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसापासून बेपत्ता आहेत.

डहाणू येथील शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास काही दिवसापासून सुरू केला होता. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरात येथील भिलाड जवळ त्यांची कार एका तलावात सापडली आहे. या कारमध्ये मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

Maharashtra Politics : "कुणी भगवान गडावर गेले म्हणून...", शिंदे गटातील नेत्याने धनंजय मुंडेंबाबत स्पष्टच सांगितलं

मिळालेली माहिती अशी, गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला होता. धोड यांची कार गुजरात येथील सरिग्राम येथील मालाफलिया येथील एका बंद असलेल्या दगड खाणीजवळ असलेल्या तलावात सापडली. पोलिसांनी ही कार बाहेर काढली आहे. ही कार अशोक धोडी यांचीच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पालघर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. 

जॅकेट आणि हेडफोन सापडले

गेल्या काही दिवसापासून पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील हे स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी ही कार तलावातून बाहेर काढण्यापूर्वी त्यांना एक काळ्या रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचे हेडफोन मिळाले आहेत. 

गुजरातमधील हे ठिकाण निर्जनस्थळी आहे. बंद असलेली दगडाची ही खाण आहे. या खाणीजवळ एक तलाव आहे. या तलावामध्येच अशोक धोडी यांची कार सापडली आहे. तलावाकाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, आता कार बाहेर काढण्यात आली आहे.  

अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार

गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले शिंदेसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणाचं गौडबंगाल कायम आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी आणि अन्य चौघांना ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीसाठी पोलिसांकडे आलेला संशयित आरोपी अविनाश धोडी अंधाराचा फायदा पोलीस ठाण्यातूनच घेत पसार झाला आहे. घोलवड पोलीस ठाण्यातील अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात संशयित अविनाश धोडीला चौकशीसाठी बोलावलं होते. मात्र तो फरार झाला. 

२० जानेवारीपासून बेपत्ता

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले अशोक धोडी हे हॉटेल व्यावसायिकही आहेत. २० जानेवारीपासून अशोक धोडी बेपत्ता आहेत. याबाबत अशोक धोडी यांच्या पत्नीने घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीत त्यांनी दीरावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यात अविनाश धोडीला ताब्यात घेतले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत अविनाश पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याचं समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे