शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शिवसेना-भाजपामध्ये एसटीसेवेवरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:21 IST

वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत.

विरार : वसई तालुक्यात मनपाची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर २०१७ मध्ये अनेक मार्गवरील एसटी सेवा बंद झाली होती. त्यासाठी प्रवासी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीत. त्याची दाखल घेत एसटी सेवा पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळाले असल्याने या सुरु होणाऱ्या एसटी सेवेचे श्रेय लाटण्यासाठी सेना भाजपा मध्ये चांगलीच जुंपली आहे.वसईत १९६० मध्ये एसटी सेवा सुरू झाली होती. शहरात तत्कालीन वेळेस मनपाने परिवहन सेवा सुरु केल्याने २०१७ मध्ये अनेक मार्गांवरील बस सेवा तोट्यामुळे हळूहळू बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी हवालदिल झाले. वसई पश्चिमेकडील शेतकरी, चाकरमान्यांना एसटीसेवेचा आधार होता. भाजीपाला आणि अन्य सामान एसटी बसमधूनच पोहोचवले जात होते. एसटी सेवा रात्रीही सुरू असल्याने प्रवाशांची सोय होत होती. परंतु या अनेक मार्गांवरील एसटी सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला.एसटी सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाली.या जनआंदोलन समितीने पुढाकार घेतला.विवेक पंडित, मिलिंद खानोलकर, विनायक निकम, डॉमनिका डाबरे, प्रफुल्ल ठाकूर आदी नेत्यांसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक रस्त्यांवर उतरले. सरकारने मात्र नागरिकांच्या मागणीची आणि आंदोलनांची दखल घेतली नाही. ‘शिवसेनेकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यायचे होते ; एसटी सुरू झाली असती’ असे वक्तव्य मुख्यमंत्रांनी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान केले होते.शिवसेनेच्या परिवहनमंत्र्यांनी एसटी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे एसटी सेवा सुरू होईल, अशी आशा नागरिकांना वाटते आहे. पोटनिवडणूकीच्या काळात एसटी सेवेसाठी आंदोलनात पुढाकार घेणाºयापैकी काही कार्यकर्ते शिवसेनेत आणि काही जण भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता एसटी सेवा सुरू करण्यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसईत एसटी सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी माजी आमदार विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला. कार्यकर्त्यांनी लढा दिला. त्यामुळे वसईत लवकरच एसटी सुरू होईल .- प्रफुल्ल ठाकूर, जनआंदोलन समितीएसटी सेवेसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली.त्यांनी वसईत लवकरच एसटी सुरू होईल असे सांगितले. परिवहन व्यवस्था करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यात श्रेयाची लढाई नको.- मिलिंद खानोलकर, कार्यकर्ते

टॅग्स :Vasai Virarवसई विरार