प्राथमिक शिक्षकांना शरद पवारांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:34 IST2018-03-27T00:34:56+5:302018-03-27T00:34:56+5:30
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन डहाणू येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी शिक्षक सहकार संघटना

प्राथमिक शिक्षकांना शरद पवारांचे आश्वासन
तलासरी : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन डहाणू येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी शिक्षक सहकार संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटन यांना दिले.
यावेळी त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील नियूक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मृत कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना तात्काळ कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावीे, राज्यात मागासवर्गीय कक्षाप्रमाणे खुला प्रवर्ग कक्ष स्थापन करावा, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, १२ वर्ष सेवाकाल पूर्ण झाल्यानंतर दिल्या जाणाºया वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करवा, प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या शिक्षकांच्या होणाºया वसुलीला स्थगीती देणे या मागण्यांचा समावेश होता. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य समन्वयक संभाजी पोळ, दत्ता मदने, जिल्हाध्यक्ष नितीन तिडोळे, शाहू भारती, सुदर्शन वांगदरे, पांडुरंग ढाकरे, प्रशांत शेळके, विष्णू भोसले, मुकेश बारगळ, गणेश लांडगे, सुनील तुमराम उपस्थित होते.