शहापूर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा
By Admin | Updated: May 2, 2016 01:18 IST2016-05-02T01:18:31+5:302016-05-02T01:18:31+5:30
नवा आणि जुना अशा अंतर्गत वादामुळे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनी अखेर आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे. यामागे खासदार कपील पाटील आणि आमदार

शहापूर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा
शहापूर : नवा आणि जुना अशा अंतर्गत वादामुळे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनी अखेर आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे. यामागे खासदार कपील पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
ठाणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष दयानंद चोरगे याना दिलेल्या राजिनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की गेल्या एक वर्षापासून मी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी पेलली खेडोपाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करु न तालुक्यात भाजपला सक्र ीय केले आहे.
दरम्यान काशीनाथ भाकरे याना डच्चू मिळाल्याने शिंदेच्या विरोधी मोहिमेला अधिक बळकटी मिळाली असून प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस पर्यंत गेले आहे. (वार्ताहर)
वीस वर्षात एकही सदस्य शहापूर ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेला नसताना माझ्या कारकिर्दीत शहापूर नगरपंचायतीत तीन नगरसेवक निवडून आले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत २२ पंचायतीवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. असे असतांनाही प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार कपील पाटील यांच्याकडे सतत माझ्या बाबतीत तक्रारी सुरु आहेत.