शाहीर सचिन माळी यांना पीएच.डी.साठी परवानगी

By Admin | Updated: February 11, 2015 00:16 IST2015-02-11T00:15:54+5:302015-02-11T00:16:33+5:30

कबीर कला मंचचे कलावंत शाहीर सचिन माळी यांना सत्र न्यायालयाने पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी परवानगी दिली आहे़ माळी यांच्यावर नक्षलवादाचा प्रचार

Shahir Sachin Mali's permission for Ph.D. | शाहीर सचिन माळी यांना पीएच.डी.साठी परवानगी

शाहीर सचिन माळी यांना पीएच.डी.साठी परवानगी

मुंबई : कबीर कला मंचचे कलावंत शाहीर सचिन माळी यांना सत्र न्यायालयाने पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी परवानगी दिली आहे़ माळी यांच्यावर नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोप राज्य दशहतवादविरोधी पथकाने ठेवला आहे. दोन वर्षांपूर्वी माळी यांनी विधान भवनासमोर आत्मसमर्पण केले होते.
आत्मसमर्पणानंतर माळी व त्यांच्या पत्नी शीतल साठे यांना अटक करण्यात आली. त्या वेळी कला मंचच्या वतीने विधान भवनाजवळ गाणी सादर करून निषेध नोंदवला होता़ तेव्हापासून माळी हे कारागृहातच आहेत़ त्यांचे कला शाखेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे़ आता त्यांना पीएच.डी. करायची आहे़ यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज माळी यांनी न्यायालयात केला होता़
मी २०१३पासून कारागृहातच आहे़ तरीही तेथील वातावरणाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही़ इतर कोणत्याही गुन्ह्याचा माझ्यावर आरोप नाही; तसेच मला पीएच.डी.साठी परवानगी दिल्यास पुढे नोकरीसाठी याचा मला फायदा हाईल़ तेव्हा मला पीएच.डी. पूर्ण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माळी यांनी अर्जात केली होती़ ती न्यायालयाने मान्य केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Shahir Sachin Mali's permission for Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.