शहाड उड्डाणपुलाची दुरुस्ती अजूनही ठप्पच!

By Admin | Updated: September 23, 2015 23:41 IST2015-09-23T23:41:04+5:302015-09-23T23:41:04+5:30

कल्याण-मुरबाड-जगदाळपूर या राष्ट्रीय महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या मुरबाड दिशेने जाणाऱ्या बाजूच्या स्लॅबला मध्यभागीच मोठे भगदाड पडल्याने गेल्या

Shahad flyover repair still jam | शहाड उड्डाणपुलाची दुरुस्ती अजूनही ठप्पच!

शहाड उड्डाणपुलाची दुरुस्ती अजूनही ठप्पच!

म्हारळ : कल्याण-मुरबाड-जगदाळपूर या राष्ट्रीय महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या मुरबाड दिशेने जाणाऱ्या बाजूच्या स्लॅबला मध्यभागीच मोठे भगदाड पडल्याने गेल्या २० दिवसांपासून या महामार्गावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. तर, ऐन सणासुदीला पोलीस बंदोबस्त मिळू शकत नसल्याने त्याच्या रिपेअरिंगचे (दुरुस्ती) काम रखडल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागातून सांगण्यात येत आहे.
पुलास खाली तात्पुरत्या लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. खड्डा पडलेला स्लॅब पूर्णपणे कमकुवत झाला असून तो नव्याने होणे आवश्यक आहे. ऐन गणेशोत्सवास पोलीस बंदोबस्त मिळू शकत नाही. परिणामी, धोकादायक स्थितीतच पुलावर अवजड वाहतूक सुरू आहे. गत वर्षापासून या पुलाच्या रिपेअरिंगचे काम सुरू होते. कमकुवत झालेले रेलिंग पूर्णपणे बदलण्यात आले. त्यामुळे पुलावरून खाली पडून होणारे अपघात कमी झाले आहेत. आता या नवीन पडलेल्या खड्ड्याचे काम त्वरित होण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Shahad flyover repair still jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.