बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: February 4, 2017 02:48 IST2017-02-04T02:48:39+5:302017-02-04T02:48:39+5:30
जन्मदात्या पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक केल्याचा प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केली आहे.
बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार
विरार : जन्मदात्या पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक केल्याचा प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केली आहे.
पीडित मुलगी ही सध्या अकरावीत शिकत असून ती सातवीत असल्यापासून वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी मुलीने आपल्या आईला सांगितले. तेव्हा आईने पित्याला खडसावले होते. काही दिवसानंतर पित्याने पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली.
मुलगी नकार द्यायची तेव्हा वडील मुलीला ‘मी तुझा खून करील आणि स्वतही आत्महत्या करेन’, अशी धमकी द्यायचा. जीवाच्या धाकाने मुलगी सगळे सहन करत होती. आणि बापाने अत्याचार सुरूच ठेवला होती. शेवटी मुलीने पित्याच्या अत्याचाराला कंटाळून मैत्रिणीची मदत घेतली. दोघींनी एका नगरसेविकेच्या सहाय्याने तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बापाच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी पित्याच्या विरोधात लहान बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. (वार्ताहर)