शाळेत लैंगिक शिक्षण

By Admin | Updated: September 7, 2016 02:26 IST2016-09-07T02:26:48+5:302016-09-07T02:26:48+5:30

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाने विविध योजना सुरू केल्या आहेत.

Sexual education in school | शाळेत लैंगिक शिक्षण

शाळेत लैंगिक शिक्षण

ठाणे : ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाने विविध योजना सुरू केल्या आहेत. आता यापुढेही जाऊन किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी माहिती व्हावी, म्हणून त्यांना हे शिक्षण देण्याची पावले उचलली आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आठवी ते दहावीपर्यंतच्या ४९७५ विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
यासंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या १२६ शाळा असून यामध्ये ३५ हजार ४२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता आठवी ते दहावीमध्ये यातील ४९७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचे आरोग्यविषयक अवलोकन पालिकेने केले होते. त्यानुसार, त्यांना आता लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. कुमारवयात या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतात. त्यामुळे या वयात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ही मुले व्यसन अथवा इतर तत्सम दुर्गुणांना बळी पडू शकतात.
त्यामुळे त्यांना यापासून वाचवण्यासाठी आता महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना लैंगिक शिक्षण देण्याची पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual education in school