‘विवा’ला सात पारितोषिके

By Admin | Updated: September 11, 2015 00:28 IST2015-09-11T00:28:01+5:302015-09-11T00:28:01+5:30

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित ४८व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात यंदा विरारच्या विवा विद्यालयाने सात विभागांमध्ये पारितोषिके पटकावली.

Seven Priestes to 'Viva' | ‘विवा’ला सात पारितोषिके

‘विवा’ला सात पारितोषिके

वसई : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित ४८व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात यंदा विरारच्या विवा विद्यालयाने सात विभागांमध्ये पारितोषिके पटकावली.
चर्चगेटच्या विद्यापिठाच्या सभागृहात ८ सप्टेंबर रोजी भारतीय लोककला नृत्य या शेवटच्या स्पर्धेने यंदाच्या युवा महोत्सवाची सांगता झाली. याच स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळवत ‘विवा’ने शेवटचा दिवस गाजवला. गुजरातचा परंपरागत रास-गरबा या नृत्यप्रकाराची निवड यंदा महाविद्यालयाने केली होती.
भारतीय समूह गीत आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांमध्येही ‘विवा’ने प्रत्येकी तृतीय आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. त्यानंतर मराठी एकांकीका विभागात तृतीय क्रमांक मिळविला.
‘वुई द पीपल’ ही एकांकीका यंदा सादर केली. याच एकांकीकेसाठी सिद्धेश कर्णिक याला द्वितीय क्रमांकाचे सर्वोत्तम अभिनेता म्हणून तर अनिकेत मोरे याला सर्वोत्तम अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. हिंदी एकांकीकेला विभागातही महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. या यशवंत विद्यार्थ्यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे. (प्रतिनिधी)

‘तदैव लग्नम’ या एकांकीकेसाठी सिद्धेश कर्णिक याला सर्वोत्तम अभिनेता म्हणून द्वितीय क्रमांकाचे तर ग्रीष्मा पिल्लई हिला अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ‘मायमिंग’ या विभागातही ‘विवा’ने दणणीत बाजी मारुन प्रथम क्रमांक मिळवला. फाईन आर्ट विभागांतर्गत आॅन द स्पॉट पेंटींग या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. युवा महोत्सवात विवा महाविद्यालय एकूण सात स्पर्धांमध्ये बक्षिसाचे मानकरी ठरले.

Web Title: Seven Priestes to 'Viva'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.