लोकमतमध्ये वृत्त येताच सेप्टी टँक झाली स्वच्छ
By Admin | Updated: November 10, 2016 02:48 IST2016-11-10T02:48:12+5:302016-11-10T02:48:12+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारातील तुंबलेली शौचालयाची सेप्टी टँक तुंबून संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त बुधवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच

लोकमतमध्ये वृत्त येताच सेप्टी टँक झाली स्वच्छ
पंकज राऊत, बोईसर
येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारातील तुंबलेली शौचालयाची सेप्टी टँक तुंबून संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त बुधवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतीला ११ महिन्यांनी जाग आली व ही टँक तातडीने स्वच्छ करण्यात आली.
याबाबत रूग्णालया प्रशासनाने जानेवारी २०१६ पासून बोईसर ग्रामपंचायतीला अनेक वेळा पत्राद्वारे विनंती केली होती परंतु, ग्रामपंचायतीने त्या पत्रांची गंभीर दखल घेतली नव्हती. मात्र बुधवारी लोकमतमध्ये ग्रामीण रूग्णालयाची सेफ्टी टँक तुंबली, रोगराईचा धोका या शिर्षकाखाली वृत्त प्रसिध्द होताच आज ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. होऊन तुंबलेली सेफ्टी टँक साफ केली. तुंबलेल्या शौचालयाच्या टाकीमधून दुर्गंधीयुक्त घाण पाणी बाहेर पडून सर्वत्र साचत होते त्या पाण्यामध्ये हजारो डासांची उत्पत्ती होत होती त्यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांना डेंग्यू व साथीचे आजार होण्याची शक्यता होती. रूग्णालयात उपचारासाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी यायचे की नवा आजार घेण्यासाठी जायचे असा प्रश्न होता. रूग्णालयाने पंचायतीला २१ व २५ जानेवारीला तर तिसरे पत्र ७ नोव्हेंबरला दिले. परंतु ग्रामपंचायतीने त्या पत्रांची दखल घेतली नव्हती.