शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ‘निर्भया’ नंबराने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 00:00 IST

वसई - विरारमधील मुलींनो सावधान : अडचणीत असलेल्यांना बसू शकतो फटका

सुनील घरत।लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई - विरार भागात सोशल मीडियावर महिलांसाठी निर्भया नावाने एक मोबाइल नं. फिरतो आहे. संकटकाळी या नंबरवर फोन करा, तुम्हाला मदत मिळेल, असे आवाहन मेसेजवर करण्यात आले आहे.

तरुणींनी संकटसमयी पोलिसांची मदत मागता यावी, यासाठी हा ‘निर्भया’ नावाचा नंबर सेव्ह करावा. त्यावर मिस कॉल दिल्यास काही वेळातच पोलीस मदतीला येतील, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, तो नंबर पोलिसांचा नाही. एवढेच नाही तर त्यातील काही नंबर बंद आहेत तर काही नंबर हे सर्वसामान्य लोकांचे असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.हैदराबाद येथील तरुणीवर चौघांनी सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याने सारा देश हादरला. या घटनेवर देशभरातून सोशल मीडियावर सातत्याने कमेंट आणि पोस्ट सुरू आहेत. त्यापैकीच एका कमेंटमध्ये ‘निर्भया’ नावाने एक मोबाइल नंबर व्हायरल होताना दिसतो आहे. विशेष म्हणजे एकाच आशयाच्या अनेक मेसेजमध्ये ‘निर्भया’ या नावाने वेगवेगळे नंबर आहेत. त्या सर्व नंबरवर ‘लोकमत’च्या टीमने फोन केला तेव्हा त्यातील काही नंबर बीडचे, काही सोलापूरच्या सामान्य नागरिकांचे नंबर होते. मात्र बहुतांश नेटिझन्स हा नंबर खात्री न करताच सेव्ह करत आहेत, तर अनेकजण हा नंबर म्हणजे पोलीस हेल्पलाइन असल्याचे समजून व्हायरल करत आहेत. संकटकाळात मदतीसाठी तरूणींनी जर सोशल मीडियावर आलेल्या ‘निर्भया’या नंबरवर मिस कॉल तसेच मेसेज केल्यास त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे शक्यतो असा नंबर तरुणींनी सेव्ह करू नये वा व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.पोलिसांच्या संदर्भातील व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसजेस तपासून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. पोलीस हेल्पलाइनसाठी ‘१००’ हा देशभरातील अधिकृत नंबर आहे. त्यावर येणारे सर्व कॉल, मिस्डकॉलसुद्धा रेकॉर्ड केले जातात. त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या मदतीसाठी १०० नंबरवरच संपर्क करावा, असे आवाहन पोलीस करत आहेत.

सोशन मीडीयावर व्हायरल होणार मेसेजच्तुम्ही एकट्या असाल आणि काही अडचणी आल्या तर ‘निर्भया’ विशिष्ट नंबरवर मिस्डकॉल करा किंवा ब्लँक मेसेज पाठवा. त्यामुळे पोलीस तुमच्या मोबाइलचे लोकेशन शोधून तुमच्यापर्यंत पोचतील. हा मेसेज जास्तीजास्त माता-भगिनींपर्यंत पोहोचवा, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. अशा बनावट नंबरमुळे तरुणींच्या अडचणी वाढू शकतात.च्निर्भया या नावाने व्हायरल होणाया नंबरमध्ये वेगवेगळे नंबर फिरत आहेत. त्यामध्ये विशिष्ट नंबर सर्वात जास्त व्हायरल होताना दिसतात. तो नंबर डायल केल्यावर तो अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारच्या या बोगस नंबरमुळे रात्री अपरात्री मुलगी एकटी असल्यास वरील बोगस नंबर लावल्यास तिचा पत्ता रोडरोमिओंना सापडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या मुलीला धोकाही निर्माण होऊ शकतो.सोशल मीडियावर निर्भया नावाने मुलींच्या मदतीसाठी व्हायरल होत असलेल्या नंबरची खात्री केल्याखेरीज मदत मागू नये. याची काळजी पालक तसेच मुली अशा दोघांनीही घ्यावी. संकटात असल्यास १०० नंबरवर फोन करून पोलिसांची मदत घ्यावी. - विजयकांत सागर, अप्पर अधीक्षक, वसई.