बोगस ‘निर्भया’ नंबराने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:00 AM2019-12-19T00:00:32+5:302019-12-19T00:00:39+5:30

वसई - विरारमधील मुलींनो सावधान : अडचणीत असलेल्यांना बसू शकतो फटका

Sensation of fake 'Nirbhaya' numbers | बोगस ‘निर्भया’ नंबराने खळबळ

बोगस ‘निर्भया’ नंबराने खळबळ

Next

सुनील घरत।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई - विरार भागात सोशल मीडियावर महिलांसाठी निर्भया नावाने एक मोबाइल नं. फिरतो आहे. संकटकाळी या नंबरवर फोन करा, तुम्हाला मदत मिळेल, असे आवाहन मेसेजवर करण्यात आले आहे.


तरुणींनी संकटसमयी पोलिसांची मदत मागता यावी, यासाठी हा ‘निर्भया’ नावाचा नंबर सेव्ह करावा. त्यावर मिस कॉल दिल्यास काही वेळातच पोलीस मदतीला येतील, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, तो नंबर पोलिसांचा नाही. एवढेच नाही तर त्यातील काही नंबर बंद आहेत तर काही नंबर हे सर्वसामान्य लोकांचे असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.
हैदराबाद येथील तरुणीवर चौघांनी सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याने सारा देश हादरला. या घटनेवर देशभरातून सोशल मीडियावर सातत्याने कमेंट आणि पोस्ट सुरू आहेत. त्यापैकीच एका कमेंटमध्ये ‘निर्भया’ नावाने एक मोबाइल नंबर व्हायरल होताना दिसतो आहे. विशेष म्हणजे एकाच आशयाच्या अनेक मेसेजमध्ये ‘निर्भया’ या नावाने वेगवेगळे नंबर आहेत. त्या सर्व नंबरवर ‘लोकमत’च्या टीमने फोन केला तेव्हा त्यातील काही नंबर बीडचे, काही सोलापूरच्या सामान्य नागरिकांचे नंबर होते. मात्र बहुतांश नेटिझन्स हा नंबर खात्री न करताच सेव्ह करत आहेत, तर अनेकजण हा नंबर म्हणजे पोलीस हेल्पलाइन असल्याचे समजून व्हायरल करत आहेत. संकटकाळात मदतीसाठी तरूणींनी जर सोशल मीडियावर आलेल्या ‘निर्भया’या नंबरवर मिस कॉल तसेच मेसेज केल्यास त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे शक्यतो असा नंबर तरुणींनी सेव्ह करू नये वा व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.
पोलिसांच्या संदर्भातील व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसजेस तपासून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. पोलीस हेल्पलाइनसाठी ‘१००’ हा देशभरातील अधिकृत नंबर आहे. त्यावर येणारे सर्व कॉल, मिस्डकॉलसुद्धा रेकॉर्ड केले जातात. त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या मदतीसाठी १०० नंबरवरच संपर्क करावा, असे आवाहन पोलीस करत आहेत.


सोशन मीडीयावर व्हायरल होणार मेसेज
च्तुम्ही एकट्या असाल आणि काही अडचणी आल्या तर ‘निर्भया’ विशिष्ट नंबरवर मिस्डकॉल करा किंवा ब्लँक मेसेज पाठवा. त्यामुळे पोलीस तुमच्या मोबाइलचे लोकेशन शोधून तुमच्यापर्यंत पोचतील. हा मेसेज जास्तीजास्त माता-भगिनींपर्यंत पोहोचवा, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. अशा बनावट नंबरमुळे तरुणींच्या अडचणी वाढू शकतात.
च्निर्भया या नावाने व्हायरल होणाया नंबरमध्ये वेगवेगळे नंबर फिरत आहेत. त्यामध्ये विशिष्ट नंबर सर्वात जास्त व्हायरल होताना दिसतात. तो नंबर डायल केल्यावर तो अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारच्या या बोगस नंबरमुळे रात्री अपरात्री मुलगी एकटी असल्यास वरील बोगस नंबर लावल्यास तिचा पत्ता रोडरोमिओंना सापडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या मुलीला धोकाही निर्माण होऊ शकतो.

सोशल मीडियावर निर्भया नावाने मुलींच्या मदतीसाठी व्हायरल होत असलेल्या नंबरची खात्री केल्याखेरीज मदत मागू नये. याची काळजी पालक तसेच मुली अशा दोघांनीही घ्यावी. संकटात असल्यास १०० नंबरवर फोन करून पोलिसांची मदत घ्यावी. - विजयकांत सागर, अप्पर अधीक्षक, वसई.

Web Title: Sensation of fake 'Nirbhaya' numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.