अ‍ॅटोमिक सेंटरची सुरक्षा भेदली

By Admin | Updated: August 24, 2015 02:27 IST2015-08-24T02:27:25+5:302015-08-24T02:27:25+5:30

अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या आवारात शिरून महागड्या केबलची चोरी करून पळून जाणाऱ्या चोराला रिक्षासह तारापूर पोलिसांनी

The security of the atomic center penetrates | अ‍ॅटोमिक सेंटरची सुरक्षा भेदली

अ‍ॅटोमिक सेंटरची सुरक्षा भेदली

बोईसर : अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या आवारात शिरून महागड्या केबलची चोरी करून पळून जाणाऱ्या चोराला रिक्षासह तारापूर पोलिसांनी २२ आॅगस्टच्या रात्री पकडले असून एका जागृत नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून चोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याने देशाच्या अतिसंवेदनशील ऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी हेच जणू चोरांनी दाखवून दिले आहे.
तारापूर येथे १६० मेगावॅटच्या दोन व ५४० मेगावॅटच्या दोन अणुभट्ट्यांबरोबरच अत्यंत महत्त्वाचे भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) असे देशाचे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांच्या आत बाहेरील सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी.आय.एस.एफ) आहे. तसेच सी.सी. कॅमेऱ्याद्वारे या महत्त्वाच्या प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा राबविली जाते. असे असतानाही चोर प्रकल्पाच्या आवारापर्यंत पोहोचलाच कसा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या चोराने दहा पेयर व ०.७५ मिमीची काळे प्लॅस्टिक आवरण असलेल्या ६८ व ५३ मीटर अशी एकूण १२१ मीटर लांब असलेल्या दोन पॉलीकॅब वायरचे बंडल चोरले होते. या प्रकरणात तारापूर गावातील एका आरोपीला पकडले असून त्याच्याजवळून अन्य साथीदारांची माहिती घेण्यात येऊन यामागे कुणी मोठी टोळी आहे का, याचीही तपासणी तारापूर पोलीस करीत आहेत.
जून २०१५ मध्ये तारापूरच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आय.पी. प्लँटमधील गवताळ भागातून केबल चोरीच्या घटनेची पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आताच्या घटनेची तक्रार तारापूर अणुऊर्जा केंद्राकडून दाखल करण्यात आली नव्हती.

Web Title: The security of the atomic center penetrates