सलग पाच वर्षे खाडा न करणारी ययाती देशात दुसरी

By Admin | Updated: April 18, 2017 06:41 IST2017-04-18T06:41:39+5:302017-04-18T06:41:39+5:30

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने इयत्ता दुसरी ते सहावी पर्यंत सलग

The second in the country that does not have Khadha for five consecutive years | सलग पाच वर्षे खाडा न करणारी ययाती देशात दुसरी

सलग पाच वर्षे खाडा न करणारी ययाती देशात दुसरी

अनिरुध्द पाटील, बोर्डी
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या ययाती शैलेन्द्र गावड या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने इयत्ता दुसरी ते सहावी पर्यंत सलग पाचही शालेय वर्षात शंभरटक्के उपस्थित राहण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे ती राष्ट्रीयस्तरावरील द्वितीय आणि राज्य स्तरावरील पहिली विद्यार्थिनी बनली आहे.
तिचे पूर्व प्राथमिक शिक्षण डहाणू पारनाका येथील न्यू एज्युकेशन ट्रस्ट येथे झाले. सण २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात ती दुसरी इयत्तेत शिकताना एकही दिवस अनुपिस्थत राहिली नाही. त्यानंतर तिसरी, चौथी इयत्तेत हजेरीपटावरील तिची उपस्थिती शंभर टक्के राहिली. या तिन वर्षाच्या काळात तिने दररोज सोळा किमीचा प्रवास खाजगी वाहनातून केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात प्रवेश घेतला. तेथेही ५ वी व ६ वी इयत्तेमध्ये वर्षभर उपस्थिती कायम राखली. गतवर्षी डहाणू तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद झाली शिवाय काही दिवस पुरस्थिती होती. मात्र या वेळी वडिलांनी तिला दुचाकीवर शाळेत सोडल्याने हजर राहता आले. अभ्यासाप्रमाणेच संस्कृतिक कार्यक्र म, वक्तृत्व स्पर्धा आणि खेळात तरबेज आहे. पहाटे उठून व्यायाम, योग अभ्यास, गृहपाठ, अवांतर वाचन, टीव्ही पाहणे आणि भावंड व समवयीन मुलांशी खेळणे हा तिचा दिनक्रम आहे. जंकफूडला बगल देत घरी बनविलेले जेवण सर्वाधिक प्रिय असून तिच्या आरोग्याची गुरु किल्ली असल्याचे आई पौर्णिमा हिचे म्हणणे आहे. आई-वडील दोघांनीही बिपीएडपर्यंतचे शिक्षण घेतल्याने खेळाचा वारसा तिने जपला आहे.
दरम्यान, इंटरनेटच्या माध्यमातून ‘हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन स्कूल’ या साईटला भेट दिल्यानंतर आपल्या पाल्याने नकळत एका विक्र माची नोंद केल्याचे वडील शैलेन्द्र यांच्या लक्षात आले.
भोपाळच्या मानसी दास या ९ वी इयत्तेतील विद्यार्थिनीने सलग नऊ वर्ष उपस्थित राहण्याचा विक्र म केला आहे. दास ही शहरी भागातील विद्यार्थिनी आहे. तर घर ते शाळा हा खडतर प्रवास करणारी ग्रामीण भागातल्या ययाती गावड ही राष्ट्रीय पातळीवरील दुसरी आणि राज्यस्तरावरील पहिली विद्यार्थिनी बनली आहे. या बाबत लवकरच कागदपत्रांची जमवाजमव करून इंडियन रेकॉर्डसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे शैलेन्द्र गावड यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: The second in the country that does not have Khadha for five consecutive years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.