शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शनिवार ठरला अपघातवार

By admin | Updated: March 28, 2015 22:25 IST

कर्जत - मुरबाड रस्त्यावर कर्जत शहराजवळ दोन दुचाकींची समोरा समोर धडक झाली. या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

कर्जत : कर्जत - मुरबाड रस्त्यावर कर्जत शहराजवळ दोन दुचाकींची समोरा समोर धडक झाली. या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याला वाशी येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील शिवाजी मारु ती थोरवे हे काही कामानिमित्त वेणगाव येथून दुचाकीने (एमएच-०६-एपी-४२६५) कर्जतला येत होते. तर वांजळे येथून विनोद मारु ती ठाकरे हे (एमएच-०६ एजी ३१९१) दुचाकीने कर्जतला येत होते. दोन्ही दुचाकी समोराससमोर आल्याने धडक बसणार हे बघून विनोद ठाकरेच्या मागे बसलेल्या रु पेश दाभणे याने उडी मारून जीव वाचिवण्याचा प्रयत्न केला. विनोद ठाकरेच्या दुचाकीची शिवाजी थोरवेच्या दुचाकीला जोरात धडक बसली. या धडकेत शिवाजी थोरवेच्या डोक्याला जबर मार लागला. या धडकेत शिवाजी थोरवे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कर्जत - मुरबाड रस्त्यावरील विहंग अपार्टमेंटसमोर रात्री दहाच्या सुमारास झाला. अपघातानंतर दोघांना तातडीने कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. विनोद ठाकरे हा जखमी झाल्याने वाशीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहा : रोह्यात दुचाकी घसरल्याने खालचा मोहल्ला येथील सिराज मैमुद्दीन शेख (१६), ऐजाज समीर मुल्ला (१७) आणि इफ्तियार वलीमहम्मद शेख (१७) वरचा मोहल्ला हे अल्पवयीन युवक जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. (वार्ताहर)कळंबोली : येथील धन्वंतरी हॉस्पिटलच्या पाठीमागील मुंब्रा - पनवेल महामार्गावर आज ट्रक-मोटारसायकलचा अपघात होऊन त्यात मोटारसायकलस्वार किशोर पांडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंब्य्राहून पनवेल मार्गाने येणारा ट्रक आणि मुंंब्य्राकडे जाणाऱ्या मोटारसायकलचा अपघात झाला. मुंंब्य्राच्या दिशेने मोटारसायकलवरून किशोर पांडे ( ५५, रा. उल्हासनगर)हे जात असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकल घसरून किशोर पांडे हे खालीच पडले. समोरून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालविणारे रेवनाथ ढाकणे (२५, रा. मुंब्रा) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास कळंबोलीचे उपनिरीक्षक अजित साबळे करीत आहेत. (वार्ताहर)