शनिवार ठरला अपघातवार

By Admin | Updated: March 28, 2015 22:25 IST2015-03-28T22:25:09+5:302015-03-28T22:25:09+5:30

कर्जत - मुरबाड रस्त्यावर कर्जत शहराजवळ दोन दुचाकींची समोरा समोर धडक झाली. या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

Saturday was offensive | शनिवार ठरला अपघातवार

शनिवार ठरला अपघातवार

कर्जत : कर्जत - मुरबाड रस्त्यावर कर्जत शहराजवळ दोन दुचाकींची समोरा समोर धडक झाली. या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याला वाशी येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथील शिवाजी मारु ती थोरवे हे काही कामानिमित्त वेणगाव येथून दुचाकीने (एमएच-०६-एपी-४२६५) कर्जतला येत होते. तर वांजळे येथून विनोद मारु ती ठाकरे हे (एमएच-०६ एजी ३१९१) दुचाकीने कर्जतला येत होते. दोन्ही दुचाकी समोराससमोर आल्याने धडक बसणार हे बघून विनोद ठाकरेच्या मागे बसलेल्या रु पेश दाभणे याने उडी मारून जीव वाचिवण्याचा प्रयत्न केला. विनोद ठाकरेच्या दुचाकीची शिवाजी थोरवेच्या दुचाकीला जोरात धडक बसली. या धडकेत शिवाजी थोरवेच्या डोक्याला जबर मार लागला. या धडकेत शिवाजी थोरवे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कर्जत - मुरबाड रस्त्यावरील विहंग अपार्टमेंटसमोर रात्री दहाच्या सुमारास झाला. अपघातानंतर दोघांना तातडीने कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. विनोद ठाकरे हा जखमी झाल्याने वाशीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोहा : रोह्यात दुचाकी घसरल्याने खालचा मोहल्ला येथील सिराज मैमुद्दीन शेख (१६), ऐजाज समीर मुल्ला (१७) आणि इफ्तियार वलीमहम्मद शेख (१७) वरचा मोहल्ला हे अल्पवयीन युवक जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. (वार्ताहर)

कळंबोली : येथील धन्वंतरी हॉस्पिटलच्या पाठीमागील मुंब्रा - पनवेल महामार्गावर आज ट्रक-मोटारसायकलचा अपघात होऊन त्यात मोटारसायकलस्वार किशोर पांडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंब्य्राहून पनवेल मार्गाने येणारा ट्रक आणि मुंंब्य्राकडे जाणाऱ्या मोटारसायकलचा अपघात झाला. मुंंब्य्राच्या दिशेने मोटारसायकलवरून किशोर पांडे ( ५५, रा. उल्हासनगर)हे जात असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकल घसरून किशोर पांडे हे खालीच पडले. समोरून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालविणारे रेवनाथ ढाकणे (२५, रा. मुंब्रा) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास कळंबोलीचे उपनिरीक्षक अजित साबळे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Saturday was offensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.