सत्पाळा सरपंच अनिल ठाकूरचा राजीनामा
By Admin | Updated: May 3, 2016 00:29 IST2016-05-03T00:29:40+5:302016-05-03T00:29:40+5:30
सत्पाळा ग्रामपंचायतीचे वादग्रस्त सरपंच अनिल ठाकूर याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून

सत्पाळा सरपंच अनिल ठाकूरचा राजीनामा
विरार : सत्पाळा ग्रामपंचायतीचे वादग्रस्त सरपंच अनिल ठाकूर याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु होते. आजही आदिवासी एकता परिषदेने सत्पाळा गावात रास्ता रोको आंदोलन केले.
आपल्या जवळच्या नातलग मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल ठाकूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी जनआंदोलन समितीने आंदोलन छेडले होते. तर २२ एप्रिलला महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. तर २८ मार्चला महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय बंद पाडले होते. आज ठाकूर यांच्या राजीनाम्यासाठी आदिवासी एकता परिषदेने सत्पाळा गावात रास्ता रोको केले. त्यानंतर वसई पंचायत समितीचे उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनी जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना व्हॅटसअॅपवर ठाकूर यांनी २७ एप्रिलला पंचायत समितीच्या सभापतींकडे राजीनामा दिलेले पत्र पाठवून दिले. त्यामुळे वादावर तूर्तास पडदा पडला आहे. (प्रतिनिधी)