वाडा तहसीलमधील ‘अस्वच्छतागृह’
By Admin | Updated: May 14, 2017 22:41 IST2017-05-14T22:41:13+5:302017-05-14T22:41:13+5:30
येथील तहसील कार्यालयाच्या आवारात स्वच्छतागृह असून त्याची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता गृहाला दरवाजे नाहीत. आतमध्ये पाण्याचा पत्ताच नसल्याने कामानिमित्त

वाडा तहसीलमधील ‘अस्वच्छतागृह’
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात स्वच्छतागृह असून त्याची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता गृहाला दरवाजे नाहीत. आतमध्ये पाण्याचा पत्ताच नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. या स्वच्छता गृहाची दुरूस्ती करावी अशी मागणी आदिवासी मुक्ती मोर्चा या संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिकांसाठी स्वच्छता गृह असून त्यामध्ये दोन शौचालय व दोन मुताऱ्या आहेत. मात्र स्वच्छता गृहाचे दरवाजे तुटल्याने ते निरुपयोग ठरले आहे. पुरुष लघुशंकेसाठी इतरत्र जातात मात्र, यात महिलांची मोठी गैरसोय होते. तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे स्वच्छता गृहे असून सुस्थितीत आहेत. यासंदर्भात निवासी नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयात असलेल्या स्वच्छता गृहाचा वापर नागरिक सुद्धा करतात तसेच नादुरूस्त झालेले स्वच्छता गृह दुरूस्त करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.