तारापूरच्या सहायक कामगार आयुक्तपदी संभाजी व्हलाळकर

By Admin | Updated: June 3, 2016 01:44 IST2016-06-03T01:44:37+5:302016-06-03T01:44:37+5:30

तारापूर येथील सहायक कामगार आयुक्त रविराज दूळवे यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी संभाजी व्हलाळकर हे गुरुवारी रूजू झाले आहेत.

Sambhaji Valalkar as assistant assistant commissioner of Tarapur | तारापूरच्या सहायक कामगार आयुक्तपदी संभाजी व्हलाळकर

तारापूरच्या सहायक कामगार आयुक्तपदी संभाजी व्हलाळकर

बोईसर : तारापूर येथील सहायक कामगार आयुक्त रविराज दूळवे यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी संभाजी व्हलाळकर हे गुरुवारी रूजू झाले आहेत.
व्हलाळकर हे जून २०१३ पासून मुंबई येथभल कामगार आयुक्त कार्यालयातील राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाच्या सचिवपदी कार्यरत होते. त्यांच्याकडे आता पालघर, डहाणू व तलासरी या तीन तालुक्याचा कार्यभार असणार असून या तालुक्यांमध्ये सुमारे सतराशे लहान मोठे उद्योग आहेत तर पालघर जिल्हयातील उर्वरीत पाच तालुक्या करीता सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून विकास माळी यांची नेमणूक झाली असून ते ही लवकरच कार्यभार स्वीकारतील सध्या ते नाशिक येथील सहाय्यक कामगार आयुक्त पदावर कार्यरत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Sambhaji Valalkar as assistant assistant commissioner of Tarapur