नवरात्रोत्सवात कमळांची विक्री
By Admin | Updated: October 17, 2015 23:31 IST2015-10-17T23:31:03+5:302015-10-17T23:31:03+5:30
नवदुर्गेला कमळपुष्प वाहण्याची प्रथा असल्याने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या पुजेकरीता भक्तांकडून त्यांना असलेली मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातील मंदिरासमोर

नवरात्रोत्सवात कमळांची विक्री
बोर्डी : नवदुर्गेला कमळपुष्प वाहण्याची प्रथा असल्याने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या पुजेकरीता भक्तांकडून त्यांना असलेली मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातील मंदिरासमोर कमळ फुलांच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार तर भक्तांना फुल वाहिल्याचे समाधान मिळते आहे.
कमळाचे फुल हे भारताचे राष्ट्रीय फूल असून धार्मिक, सांस्कृतिक आणि देशाच्या पक्षीय राजकारणातील महत्व अधोरेखीत होते. कमळ बहुगुणी असल्याचे आयुर्वेदानेही स्पष्ट केले आहे.
नवदुर्गेला कमळ फुल वाहण्याची प्रथा असल्याने नवरात्रोत्सवात भक्तांकडून ते वाहण्याला प्राधान्य दिले जाते. डहाणू तालुक्यातील विविध गावांमधील तलावात उमललेल्या कमळाचे दृश्य पाहून मन मोहून जाते. बोर्डी परिसरातील तलावात बहुरंगी फुले दिसतात. कमळाच्या लाल व उपल्या दोन जाती आढळतात. पाने गुळगुळीत, खाली लवदार असून देठ लाल नारंगी रंगाचा असतो. ही कमळ सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात उमलतात. उपल्या कमळाची पान वर्तुळाकार असून पानाच्या खालच्या बाजूस ठिपके असतात. जांभळी, फिकट, निळी, पांढरी, गुलाबी इ. विविधरंगी फुलांना मंद सुवास असतो. नवरात्रोत्सवात पूजेकरीता भक्तांकडून कमळांची मागणी वाढविली आहे. डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदीराप्रमाणेच अन्य मंदिराच्या समोर कमळ फुलांची विक्री करणाऱ्या आदिवासींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परिसरातील तालवातून कमळांची फुल गोळा करून त्यांची डहाणू रेल्वे स्थानक, मुख्य रस्ता, सार्वजनिक स्थळी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे नरपड येथील लक्ष्मण वावरे या आदिवासी गृहस्थाने सांगितले. (वार्ताहर)
कमळ फुलांच्या विक्रीतून रोजगार उपलब्ध होतो. त्याच्या बियांचा वापर होम हवनकरीता तर कंद खाण्यासाठी उपयोगात आणतात.
- लक्ष्मण वावरे (स्थानिक आदिवासी कमळ फुल विकणारा