शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 21:02 IST

विरार ते पालघरदरम्यान, सुरु असलेल्या रो रो बोट सेवा तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली होती.

Ro-Ro Service Virar to Palghar:विरार ते खारवाडेश्री (सफाळे) या रो-रो सेवेची बोट रविवारी म्हारंबळपाडा जेटीजवळ समुद्रात अडकल्याने गोंधळ निर्माण झाला होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वाहने भरल्यामुळे बोट समुद्रात अडकली. त्यामुळे अर्धा तास प्रवासी बोटीतच अडकले होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विरार-पालघर रो-रो सेवेला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र रविवारी झालेल्या दुर्घटनेमुळे प्रवासी चिंतेत सापडले आहेत.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेल्याने सफाळे-विरार रो-रो फेरी सेवा म्हारंबळ पाडा जेट्टीजवळ अडकली. बोटीच्या रॅम्पवरील हायड्रॉलिक पाईप तुटल्यामुळे रो-रो अडकून पडली होती.  प्रवासी ३० मिनिटांहून अधिक काळ बोटीवर अडकून पडले होते. बराच वेळ बोट पुढे सरकत नसल्यामुळे बोटीवरील प्रवाशांमध्ये सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

रो-रो बोटीवर २०० हून अधिक प्रवासी आणि ७५ पेक्षा जास्त दुचाकी–चारचाकी वाहने असल्याचे म्हटलं जात आहे. बोट सुरु झाल्यानंतर रॅम्प उचलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप अचानक तुटला. त्यामुळे बोट म्हारंबळ पाडा जेट्टीच्या जवळच थांबवण्यात आली. प्रवासी अर्धा तास बोटीवर ताटकळत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला होता.

दरम्यान, खारवाडेश्री ते नारंगी या ६० किलोमीटर अंतरासाठी दीड तासांचा कालावधी लागतो. हा प्रवास रो रो बोटीने केल्यास दीड किलोमीटरचे अंतर  साधारण १५ मिनिटांत पार करता येत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी खाजगी वाहनातून महामार्गाने प्रवास न करता सफाळे ते विरार दरम्यान असलेल्या या रो रो सेवेचा लाभ घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Virar-Palghar Ro-Ro ferry stranded due to hydraulic pipe failure.

Web Summary : A Virar-Palghar Ro-Ro ferry carrying excess passengers was stranded near a jetty after a hydraulic pipe broke. Passengers were stuck for over 30 minutes, causing anxiety and anger. The popular service faced disruption.
टॅग्स :palgharपालघरVirarविरार