सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णशय्येवर
By Admin | Updated: May 2, 2016 01:20 IST2016-05-02T01:20:00+5:302016-05-02T01:20:00+5:30
येथील पंचक्रोशीत साधारणपणे २० ते २५ ग्रामीण पाड्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी असलेल्या सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णाची तपासणी करण्यास लागणारी औषधे व साहित्याची

सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णशय्येवर
- शुभदा सासवडे, सफाळे
येथील पंचक्रोशीत साधारणपणे २० ते २५ ग्रामीण पाड्यातील नागरीकांच्या आरोग्यासाठी असलेल्या सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णाची तपासणी करण्यास लागणारी औषधे व साहित्याची वानवा असल्याने गोरगरीब रूग्णांना अतिरीक्त पैसे खर्चून खाजगी दवाखान्यात जावे लागते.
सफाळे आरोग्य केंद्रात दररोज येणाऱ्या रूग्णांची संख्या ८० ते १०० च्या आसपास असून वेगवेगळ्या आजारांवरील रूग्ण औषधोपचारासाठी येत असतात. या संपूर्ण नागरीकांमध्ये ८० टक्के आदिवासी गोरगरीब नागरीकांचा समावेश आहे.
मंगळवारी निलम पाटील नावाच्या एका महिलेचा रक्तदाब वाढल्यावर तपासणीसाठी नेले असता ते मोजण्यासाठीच पाऱ्याचे मशीनच रूग्णालयात उपलब्ध नव्हते. तर इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये सेल नव्हते. त्यामुळे त्या महिलेला तशाच अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेमुळे रूग्णालयाच्या भोंगळ कारभार उघड्यावर पडला आहे. याच प्रमाणे महिनाभरापुर्वी एका आदिवासी तरूणास सर्पदंश झाला होता. त्याला ४ दिवस रूग्णालयात दाखल करून उपचारादरम्यान गुण येत नव्हता. अशात तेथील डॉक्टरांनी वेळकाढूपणा करून त्याला पुढे नेण्याचा हस्तक्षेपानंतर त्या तरूणावर योग्य उपचार करण्यात आले.
असा होतो भ्रष्टाचार
अनेकदा श्वानदंश झालेल्या रूग्णांना बाहेरून अतिरीक्त पैसे खर्चून इंजेक्शन आणायला लावली जातात. तसेच दवाखान्यात मोफत औषधे असतानाही जवळच्या मेडिकलमधून औषधे आणावयास लावली जातात.
या रूग्णालयात येथील डॉक्टर आदिवासी गोरगरीब रूग्णांकडून तपासणीसाठी १० ते २० रू. बिनदिक्कत मागीतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. येथील परिचारीकाही रूग्णांकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याचे व उद्धट वर्तन केले जात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.