उधवा-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 23:13 IST2015-09-11T23:13:04+5:302015-09-11T23:13:04+5:30

अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज

Sadness of Udhwa-Haladpada road | उधवा-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा

उधवा-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा

तलासरी : अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथे रास्तारोको आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हापरिषद सदस्य काशिनाथ चौधरी, तसेच राजु पारेख इत्यादीसह शेकडो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. उधवा मोडगाव हळदपाडा हा रस्ता १५ टन वजनाच्या क्षमतेचा परंतु या मार्गावरून ४० टन वजनाच्या गाड्या टोल चुकविण्यासाठी जात असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहने चालविणे वाहन चालकांना अशक्य झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक वेळा येथे रस्ता दुरूस्तीसाठी आंदोलने करण्यात आली परंतु प्रत्येक वेळी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत दुरूस्तीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येते. जनताही भोळीभाबडी अािध्काऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेत वारंवारच्या अधिकाऱ्यांच्या फसवेगीरीला कंटाळलेल्या व रस्त्याच्या दयनीय अवस्थेने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी आज प्रखर आंदोलन करून वाहतुक बंद पाडली. यावेळी कासा पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनकर्त्यांचे प्रखर रुप लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता तोटावर घटनास्थळी येऊन तत्काळ
रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतो असे सांगुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आजपर्यंतची अधिकाऱ्यांची फसवेगिरी पाहता आंदोलनकर्ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते यावेळी कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी मगर यांनी अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात समेट घडवून आंदोलन मागे घेण्यास लावले. उधवा-मोडगाव-हळदपाडा रस्त्याच्या दुर्दशेमुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन बळीही पडले आहेत.
आजारी माणसाला या मार्गावरून नेणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासारखे आहे.
दोन वर्षात या मार्गावर पावसाळ्यापुर्वी वा पावसाळ्यानंतरची कोणतीही दुरूस्तीची कामे करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. त्यावेळी वारंवार प्रस्ताव पाठवुन प्रस्ताव मंजुर होत नसल्याने रस्ता दुरूस्ती रखडली आहे. त्यामुळे या दुरूस्तीसाठी
केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताच रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे उपअभियंता तोटावर यांनी सांगितले. (वार्ताहर)

या मार्गावर लाखोचा निधी खर्च होऊनही रस्त्याची दुर्दशा कायम आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने आंदोलन करण्यात आले. ८ दिवसात रस्ता दुरूस्त न झाल्यास वृक्ष लागवड खड्ड्यात करण्यात येणार आहे.
- काशिनाथ चौधरी, मोडगाव,
जिल्हापरिषद सदस्य - पालघर

तात्काळ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्ता दुरूस्तीसाठी केंद्रीय निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- तोटावर, उपअभियंता सा. बां. विभाग - डहाणू

उद्यापासूनच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतो.
-निलेश सांबरे, ठेकेदार

रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात नेहमी होतात गस्त घालणे अवघड झाले आहे.
- कासा पोलीस स्टेशन कर्मचारी

Web Title: Sadness of Udhwa-Haladpada road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.