नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2024 12:17 IST2024-06-03T12:16:49+5:302024-06-03T12:17:37+5:30

नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.

rush of passengers at nalasopara virar railway station | नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी 

नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी 

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- बोरिवली रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. २५ ते ३० मिनिटांनी ट्रेन उशिराने धावत होत्या. त्यामुळे नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.

वसईहून ट्रेन प्रवाशांनी भरून येत असल्याने विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांना बसायला जागा मिळत नव्हती. त्यामुळे ही गर्दी वाढत चालली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या रेल्वेच्या खोळंब्यामूळे हजारो प्रवासी नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकात ताटकळत उभे होते. ट्रेनच्या त्रासामुळे अनेक चाकारमान्यांना कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: rush of passengers at nalasopara virar railway station