रूपाली अजूनही सर्जिकली अनफिटच
By Admin | Updated: April 24, 2017 23:44 IST2017-04-24T23:44:05+5:302017-04-24T23:44:05+5:30
चहाडे येथील रुपाली वरठा ह्या नऊ वर्ष्याच्या अपघातग्रस्त मुलीची उपचारा अभावी होणारी फरफट या लोकमतच्या वृत्ताची दखल सोमवारी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी घेऊन

रूपाली अजूनही सर्जिकली अनफिटच
हितेन नाईक/निखिल मेस्त्री / पालघर/ नंडोरे
चहाडे येथील रुपाली वरठा ह्या नऊ वर्ष्याच्या अपघातग्रस्त मुलीची उपचारा अभावी होणारी फरफट या लोकमतच्या वृत्ताची दखल सोमवारी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी घेऊन तिच्या उपचारा बाबत हलगर्जी करणाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
रुपालीला २० एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता विजेचा शॉक लागल्या नंतर तिला प्रथम उपचारासाठी मासवण च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्या नंतर तेथे तात्पुरते उपचार देऊन तिला ग्रामीण रु ग्णालय पालघर मध्ये आणण्यात आले. तेथेही प्राथमिक उपचार करून तेथून ढवळे रु ग्णालयात पाठविण्यात आले. तेथे जखमा पाहून पुढे मुंबई किंवा गुजरात येथील रु ग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, रु ग्णवाहिका नसल्याचे कारण देत तिला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तिची जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड पाहता तिच्या नातेवाईकांनी पैशाची जमवाजमव करीत खाजगी रुग्णवाहिकेने ठाण्याच्या जिल्हा रु ग्णालयात नेले होते.
गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील नायर हॉस्पिटल येथे उपचारार्थ अतिदक्षता विभागात दाखल असलेली रुपाली शुद्धीवर आली असून ती मेडिकली फिट असल्याची सुखद माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, विजेचा विद्युत प्रवाह माठ्या प्रमाणात रु पालीच्या शरीरातून गेल्याने ती भाजली आहे व त्यामुळे तिला झालेल्या जखमा खोलवर असल्याने रु पाली सर्जिकली अनिफट असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्जिकली उपचारासाठी रुपालीला नायर मधील नवीन इमारतीच्या ६ व्या मजल्यावरील बर्न केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले असून तज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करणार आहेत. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर तिची प्रकृती स्थिरावली असल्याचे समजते.
पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जन पाडा-वरचा पेठा येथे राहणाऱ्या व जि. प. शाळेत तिसरीत शिकणाऱ्या रूपलीला २० एप्रिल रोजी विजेच्या तारेचा जोरदार झटका बसला होता तद्नंतर १२ तासांनी जवळपास चार रु ग्णालय फिरल्यानंतर मुंबईतील नायर रु ग्णालायात तिच्यावर खऱ्या अर्थाने उपचार सुरु झाले. तिथे ती उपचारा दरम्यान, बेशुद्धावस्थेत होती. मात्र , डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या औषोधोपचारानंतर ती शुद्धीवर आली आहे.
असे असले तरी जिवंत वीजवाहिनीच्या मोठ्या प्रवाहामुळे
रु पाली ३५ टक्क्याहून अधिक भाजली असल्याने तिच्या शरीरावर
खोलवर जखमा झालेल्या असून तिला त्यासाठी पुढल्या उपचारासाठी प्लास्टिक सर्जन च्या देखभालीखाली ठेवण्यात येणार आहे व गरज असल्यास तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.