शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खैरा-कोंढला रस्त्याचे काम निकृष्ट

By admin | Published: January 11, 2017 6:10 AM

खेरा-कोंढला रस्त्याचे काम पंतप्रधान सडक योजना विभागाकडून करण्यात येत असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची तक्रार

वाडा : तालुक्यातील खेरा-कोंढला रस्त्याचे काम पंतप्रधान सडक योजना विभागाकडून करण्यात येत असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची तक्रार शिवसेना कुडूस विभागप्रमुख जनार्दन भेरे पंतप्रधान ग्रामसडक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाने सुमारे ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून या रस्त्याच्या कामाला मंजूरी दिली होती. हे काम गजानन कन्स्ट्रक्शनला देण्यात आले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. मुरम टाकणे बंधनकारक असतांना लाल माती टाकली आहे. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडून पूर्ण रस्ता खराब होईल. रोलींग करून मुरमाचा भराव न घालता एकदाच माती टाकली जात असून त्यावर पाणी देखील मारले जात नाही. या परीसरात लॅब नसल्याने मातीची टेस्ट झालेली नाही. शाखा अभियंता विनोद घोलप हे येथे येतच नसल्याने काम नियमाप्रमाणे चालू आहे ती नाही हे समजत नाही. ठेकेदाराच्या संगनमताने हे काम होते आहे, असे ग्रामस्थ सांगतात. काम अपूर्ण असतांनाही बिले दिली गेलीत, अशी चर्चा आहे.या रस्त्याच्या कामाचा दर्जा न राखल्याने या रस्त्यावर टाकलेली लाल माती संपूर्ण काढून तेथे टेस्ट झालेला मुरूमाचा भराव करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात या रस्त्यावर देखरेख ठेवणारे शाखा अभियंता विनोद घोलप यांच्याशी संपर्क साधला असता या रस्त्यावरील माती टेस्ट करण्यासाठी लॅब नसल्याने ती दुसरीकडून टेस्ट करून आणावी लागत असून देखरेख ठेवण्याचे काम माझे नाही. कारण मी खाजगी दोन माणसे नियुक्त केली असून गरज भासेल, तेव्हाच मी येथे येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार संदीप गणोरे यांच्याशी संपर्क साधला असता काम नियमाप्रमाणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)