शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

बेवारस वाहनांमुळे रस्त्यांची घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:52 PM

वसईकरांची डोकेदुखी : महानगरपालिका प्रशासन व पोलीस खात्याची आळीमिळी गुपचिळी

मंगेश कराळे

नालासोपारा : वसई विरार शहरातील गर्दी असलेल्या रस्त्यांच्या कडेला हजारो बेवारस आणि भंगार वाहनांमुळे वसईतील रस्त्यांची घुसमट झाली असून वसईकरांना चालणेही त्रासदायक बनले आहे. या भंगार गाड्यांमूळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येमध्ये वाढ झाली आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

रात्रीच्या वेळी गर्दुल्ले या भंगार गाड्यांमध्ये बसून चरस गांजा पिताना दिसतात. महानगरपालिकाकडे जागा नाही, वाहतूक पोलीस या गाड्या उचलत नाही. त्यामुळे नागरिकांनी कुणाकडे कैफियत मांडायची असा प्रश्न पडला आहे. या दुर्लक्षित वाहनामधील अनेक महत्वाचे पार्ट चोरीला गेल्याचे दिसत असल्याने त्यांची कस्टडी असणाऱ्या खात्यावर टिका होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्चन्यायालयाने रस्त्याच्या कडेला असणाºया या भंगार गाड्यांना हटविण्यासाठी व नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आदेश जाहीर केला होता. महानगरपालिकेकडे पार्किंग झोन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई कशी करावी हा प्रश्न उभा टाकला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वसई तालुक्यातील अनेक रस्त्याच्या कडेला ही वाहने बिनधास्तपणे पडलेली असूनही वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकायांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. शहरातील ही वाहने गुन्हेगारीचा अड्डा बनली असून पोलीस यंत्रणेकडूनही या वाहनांचा हिशेब ठेवला जात नाही.या प्रकरणी अनेक विद्यार्थी व वाटसरुंनु आपली कैफियत मांडली असून महानगरपालिका व पोलीस प्रशासन कधी कारवाई करते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.गाड्या सडल्याने पसरत आहे घाण...वसई, विरार, नालासोपारा या शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला कित्येक मिहन्यापासून भंगार गाड्या असल्याने सर्वत्र घाण पसरत आहे. नागरिक या भंगार गाड्यावर कचयाच्या पिशव्या फेकत आहे. साफसफाई कर्मचारी हा कचरा उचलत नसल्याने कचरा सडून दुर्घधीं पसरली असल्याने मच्छरांची पैदास सुद्धा वाढली आहेभंगार गाड्या बनल्या गदुर्ल्यांचा अड्डा...शहरातील अनेक रस्त्यांच्या किनायालगत मोठ्या भंगार वाहनात गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी याच गाड्यांमध्ये बसून गर्दुल्ले नशा करतात. कारण याबाबत कोणीही सामान्य नागरिक तक्र ार करत नाही. हेच गर्दुल्ले रात्रीच्या वेळी येणाया जाणाºया लोकांना निशाणा बनवून लुटतात. जर विरोध केला तर हे गर्दुल्ले नशेच्या धुंदीत जीवघेणा हल्ला करण्यास मागेपुढेही पाहत नाही. वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यात गर्दुल्यांकडून चोºया आणि मारामारीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत.महानगरपालिकेने भंगार गाड्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर अनेक रस्त्यांच्या किनाºयालगत अनेक महिन्यापासून पडून असलेल्या बेवारस आणि भंगार गाड्या एकाच ठिकाणी जमा करून ठेवता येतील.- संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभागभंगार गाड्या उचलून एका ठिकाणी जमा करण्यासाठी लवकर वाहतूक पोलिसांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल.- बळीराम पवार,आयुक्त, वसई विरारमहानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांची परिस्थिती बघता असे वाटत नाही की, आम्ही महानगरपालिका क्षेत्रात राहतो की ग्रामपंचायतीमध्ये.- राजीव सिंग (स्थानिक नागरिक)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार