The risk of diseases in chilly gardens in the monsoon | पावसाळ्यात चिकू बागांना रोगांचा धोका
पावसाळ्यात चिकू बागांना रोगांचा धोका

अनिरुद्ध पाटील 

डहाणू : जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चिकू फळपिकावर फायटोपथोरा या बुरशीजन्य रोगामुळे फळांवर काळे डाग पडतात. प्रथम जमीनीलगत आणि त्यानंतर संपूर्ण झाडाला लागण होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन बागायतदारांनाना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. दरम्यान रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्राथमिक उपाय योजावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी केले आहे.

चिकूला भौगोलिक मानांकन, फळपीक विमा कवच आदी सुविधा मिळू झाल्यानंतर निर्यातक्षम फळांचा दर्जा उत्तम राखणे आवश्यक आहे. याकरिता बागा रोगमुक्त होण्याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान जुलै आणि आॅगस्ट महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मादी पंतग फळाच्या देठावर, कळयांच्या पाकळ्यावर, तयार होत असलेल्या फळावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली सूक्ष्म अळी देठाच्या भागाकडून कळीच्या पाकळ्या खाऊन फळात प्रवेश करून गरातून थेट बीमध्ये प्रवेश करते. अळी सूक्ष्म असल्याने तीने पाडलेले छिद्र फळ वाढताना भरून येते. फळाचे बाहेरून कोणतेही लक्षण दिसून येत नाही.

योजावयाचे प्राथमिक उपाय:
च्झाडावरील रोगट, कमी उत्पादन देणाऱ्या फांद्या कापून बोर्डोपेस्ट लावावे. बोर्डोपेस्ट तयार करताना १ किलो मोरचुद व १ किलो कळीचा चुना घेऊन १० ते ३० लिटर पाणी वापरावे. बोर्डोेपेस्ट वापराने फांद्याच्या कापलेले भागावर सूक्ष्म जिवाणू व बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते.
च्पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतात चर काढावेत. बागेत खाली पडलेला पालापाचोळा, कचरा साफ नसल्याने किड व रोगास पोषक वातावरण तयार होते. याकरिता पावसाळ्यापूर्वी बाग स्वच्छ करून घ्यावी. जमिनीतील कोष व अळ्या नष्ट करण्यासाठी एकरी १२ किलो कार्बारील भुक्टी जमीनीत मिसळावी.

बागेचे व्यवस्थापन करताना प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १५ मि.लि. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. याकरिता एक महिन्याने २.८ टक्के डेल्टामेथ्रीन १० मि.लि. त्यानंतर एक महिन्याने तिसºया फवारणीसाठी लॅम्डा सायहॅलोथ्रिन ५ टक्के १० मि.लि. आणि नंतर चौथ्या फवारणीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के ५ मि.लि. १० लि. पाण्यातून फवारणे आवश्यक असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक सुनील बोरसे यांनी दिली.


Web Title: The risk of diseases in chilly gardens in the monsoon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.