तहसीलमध्ये माहिती अधिकाराची पायमल्ली

By Admin | Updated: March 1, 2016 01:53 IST2016-03-01T01:53:11+5:302016-03-01T01:53:11+5:30

शासकीय कामात पारदर्शकता यावी शासकीय कामाची व कारवाईची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायदा करायला सरकारला

Right to Information Act in Tehsil | तहसीलमध्ये माहिती अधिकाराची पायमल्ली

तहसीलमध्ये माहिती अधिकाराची पायमल्ली

सुरेश काटे, तलासरी
शासकीय कामात पारदर्शकता यावी शासकीय कामाची व कारवाईची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायदा करायला सरकारला भाग पाडल्याने अनेक शासकीय कामाची माहिती जनतेला मिळू लागली. परंतु सर्वसामान्यासाठी महत्वाच्या असलेल्या या माहिती अधिकार कायद्याची तलासरी महसूल विभागात पायमल्ली होत आहे.
तलासरी महसूल विभागात माहिती अधिकाराखाली दिलले अनेक अर्ज प्रलंबित आहेत. तलासरी महसूल विभागात नायब तहसिलदार माहिती अधिकारी तर अपिलीय अधिकारी तहसिलदार आहेत. परंतु माहिती अधिकाराखाली दिलेल्या अर्जाची माहिती मिळत नसल्याने अपिल केल्यावरही माहिती मिळत नाही, दिलेल्या अर्जाची माहिती मिळण्यास वर्ष-वर्ष होऊनही माहिती देण्यास तलासरी महसूल विभाग टाळाटाळ करीत असल्याने महसूल विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने महसूल विभागाचा या इमारतींना आशिर्वाद असावा काय? असा संशय निर्माण होत आहे. लवकरात लवकर माहिती देऊ असे तलासरी महसुल विभागाकडून सांगण्यात येते पण माहिती दिली जातच नाही.

Web Title: Right to Information Act in Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.