रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: October 1, 2015 01:33 IST2015-10-01T01:33:02+5:302015-10-01T01:33:02+5:30
पालघरच्या गोठणपूरमध्ये राहणाऱ्या एका पस्तीसवर्षीय महिलेच्या मोबाइलवर फोन करून तिचा विनयभंग करणाऱ्या सहा आसनी रिक्षाचालकाची

रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग
पालघर : पालघरच्या गोठणपूरमध्ये राहणाऱ्या एका पस्तीसवर्षीय महिलेच्या मोबाइलवर फोन करून तिचा विनयभंग करणाऱ्या सहा आसनी रिक्षाचालकाची आणि त्याच्या साथीदाराची नागरिकांनी मंगळवारी चांगलीच धुलाई केली. त्यांच्या रिक्षाची तोडफोडही करण्यात आली. याप्रकरणी पालघर पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
पालघरच्या गोठणपूरमध्ये राहणाऱ्या फिर्यादीला मंगळवारी मोबाइलवर सातत्याने फोन येत होते. हैराण झालेल्या फिर्यादीने आपल्या पतीसह तडक पालघर स्टेशनजवळील चौकी गाठून सहा. पो. उपनिरीक्षक छापाणे यांची भेट घेत सर्व हकीकत कानी घातली. याप्रकरणी पोलिसांनी सापळा लावला. त्यानंतरही फिर्यादीला स्टेशनजवळ पाहून आरोपी रिक्षाचालक हरिहर गुप्ता ऊर्फ रिंकू याने पुन्हा फोन करीत आपण रेल्वे स्टेशनबाहेर एटीएमजवळ उभा असल्याचे सांगितले. फिर्यादी रिक्षाचालकाजवळ गेल्यावर आरोपी व त्याचा साथीदार रमेश वर्मा (३०) याने तिला रिक्षात बसण्यास सांगितले. याचा तिने जाब विचारला असता तिच्याशी गैरवर्तणूक केली. (वार्ताहर)