rice paddy goes, torrential rains in Vikramgarh | उरलीसुरली भातशेतीही गेली, विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस, पिके कुजून गेली

उरलीसुरली भातशेतीही गेली, विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस, पिके कुजून गेली

विक्रमगड : अवकाळी पावसापाठोपाठ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात झाला. वातावरणात झालेल्या बदलामुळे शनिवार पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे थोडीफार उरलेली भातशेतीही वाया गेली असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
आधीच अवकाळी पावसाने विक्रमगड तालुक्यासह जिल्ह्यातील भातपिकाचे पूर्णपणे नुकसान केले होते. त्यातच शेतात भिजलेले, कोंब आलेले भातपिक शेतकऱ्यांनाही गोळा करून खळ्यात किंवा घरात आणून ठेवले होते. मात्र पुन्हा पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही पाण्यात गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
दिवाळीआधी पूर्ण पिकलेली भातशेती पावसामुळे कापता आली नव्हती. मात्र सतत पडत असलेल्या पावसाने ही पीके जमिनीवर लोळली. तसेच सतत पडणाºया पावसानेही भातशेती भिजल्याने त्याला कोंब फुटले तर काही दाणे कुजून गेले. त्यातच भाताचा पेंढा पूर्ण वाया गेला आहे. काही दिवस पडलेल्या उन्हामुळे शेतकºयांनी शेतातील जसे होते तसे पीक खळ्यात किंवा घरात आणून ठेवले. मात्र खळ्यात आणलेले भातपिक पुन्हा एकदा भिजले तर काही शेतकºयांनी ताडपत्री, प्लास्टिकच्या मदतीने ते झाकले होते. सतत कोसळणाºया पावसामुळे भातशेती पाण्यात गेली आहे. शेतकºयांचा सगळा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पिके कापली तर रोजच पाऊस. त्यामुळे ही पीके सुकवायची कशी असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. जव्हार, मोखाड्यात नागली, वरई या पिकांवर कुटुंबे सर्वाधिक अवलंबून असतात. त्यातच ही पीके हंगामी घेतली जातात. या वर्षी शेती गेली, रोजगार मिळत नाही, त्यामुळे करायचे काय? असा शेतकºयांना प्रश्न पडला आहे.

Web Title: rice paddy goes, torrential rains in Vikramgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.