शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जयंतीच्या नावे वसुली करणारे मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 00:08 IST

आर्थिक देवाणघेवाणीचा मुलामा देत गुन्हा दाखल केल्याने वर्गणीच्या नावाखाली सक्तीने वसुली करणाऱ्यांना पोलिसांनीच अभय दिल्याचे बोलले जात आहे.

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील वडवली येथील ‘आम्ही वडवलीकर’ या मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने जबरदस्तीने वर्गणी मागत कंपनी व्यवस्थापकाला मारहाण करणाऱ्या आरोपींवर या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्या ऐवजी आपसातील आर्थिक देवाणघेवाणीचा मुलामा देत गुन्हा दाखल केल्याने वर्गणीच्या नावाखाली सक्तीने वसुली करणाऱ्यांना पोलिसांनीच अभय दिल्याचे बोलले जात आहे.वाडा तालुक्यातील वडवली या गावातील ‘आम्ही वडवलीकर’ या मंडळाच्या वतीने गेल्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या जयंतीची देणगी म्हणून येथील शक्ती रेल टेक इंडिया प्रा लि. या कंपनीकडे अकरा हजार रूपयांची वर्गणीची पावती फाडली होती. मात्र कंपनीकडून एवढ्या मोठ्या रक्कमेची वर्गणी देण्यास नकार दिला होता.बुधवारी सायंकाळी कंपनीचे अधिकारी रामजी विश्वकर्मा (६०) हे घरी जात असताना वडवली येथील दहा तरु णांनी प्रवेशद्वाराजवळ रामजी यांना अडवून त्यांना लाथाबुक्कयानी व दंडुक्याने बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाले असून त्यांना उपाचाराकरिता येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.यानंतर विश्वकर्मा यांनी या घटने संदर्भात फिर्याद नोंदवली असताना पोलिसांनी मात्र जयंतीच्या निमित्ताने वर्गणी मागण्याचा संदर्भ वगळून संबंधित आरोपीने शक्ती रेल टेक इंडिया या कंपनीत वर्षभरापूर्वी बांधकामाचा ठेका घेतल्याचे दाखवून त्या पोटी कंपनीकडून देणे बाकी असल्याने दाखवत या आर्थिक देवाणघेवाणीतून दाखवून संबंधित व्यवस्थापक विश्वकर्मा यांना मारहाण केल्याची फिर्याद नोंदवली.दरम्यान, कंपनी व्यवस्थापक विश्वकर्मा यांनी झालेली मारहाण ही जयंतीच्या निमित्ताने जबरदस्तीने वर्गणी मागितल्यामुळे व एवढी मोठी रक्कम आर्थिक मंदीच्या काळात देणे शक्य नसल्याने संबंधित आरोपीने मारहाण केल्याचे सांगितले. या संदर्भातील विश्वकर्मा यांची चित्रफीत समाजमाध्यमावरही प्रसारित झाल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.>याच वर्गणीखोर मंडळाने पो. नि. शिंदे यांचा केला होता भव्य सत्कारकाही महिन्यापूर्वी वडवली येथे एका दलित कुटुंबातील निवृत्त सनदी अधिकाºयाच्या घरावर दरोडा पडला होता. या गुन्ह्याचा छडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनीअवघ्या पंधरा दिवसांत लावून आरोपींना मुद्देमालासह अटक केली. त्यामुळे आम्ही वडवलीकर या मंडळाने त्यांचा कुडूस येथे भव्य सत्कार करून त्यांना सन्मानित केले होते. या सन्मानाची उतराई म्हणूनच शिंदे यांनी आरोपी आम्ही वडवलीकर मंडळाचे पदाधिकारी असल्याने त्यांना अभय दिल्याची तालुक्यात चर्चा आहे>आरोपी हे वारंवार तुम्हाला त्रास देतील म्हणून मुळ घटनेसंदर्भात तक्र ार मी पोलिस ठाण्यात दिली होती. पंरतु संबंधित आरोपी आपल्याला वारंवार त्रास देतील असे पोलिसांनी सांगितले त्यामुळे फिर्याद आपणच नोंदवून घेत असल्याने आपणास हवी अशी फिर्याद नोंदवा असे सांगितले. माझ्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने मला चालणेही अवघड बनले आहे. - रामजी विश्वकर्मा, कंपनी मालक>यातील एका आरोपीने वर्षभरापूर्वी बांधकामाचा ठेका घेतला होता. त्या पोटी ५० हजार रु पये घेणे होते. त्यातुन मारहाण झाल्याचीतक्र ार नोंदवली आहे.- सुदाम शिंदे, पोलिस निरीक्षक, वाडा

टॅग्स :MONEYपैसा