शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
4
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
5
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
6
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
7
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
9
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
10
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
11
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
12
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
13
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
14
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
15
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
16
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
17
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
18
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
19
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
20
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
Daily Top 2Weekly Top 5

दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:31 IST

पालघर जिल्हाधिकारी : पत्रकारांशी साधला संवाद

पालघर : जिल्ह्यातील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग भेटत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आता प्रत्येक सोमवारी मुख्य अधिकाºयाने जिल्हा मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील काही समस्या आणि महत्त्वपूर्ण बाबी पत्रकारांकडून समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मनोर - विक्रमगड रस्त्याची झालेली दुरवस्था, कुपोषण तसेच रोजगाराची समस्या, त्यातून होणाºया आत्महत्या, रेशन बायोमेट्रिकचा प्रश्न असे अनेक प्रश्न समोर आले.पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य पोषण आहार, कुपोषण निर्मूलन यासोबतच शेती आणि शेतीशी निगडित रोजगार निर्मितीवर माझा प्राधान्यक्र म असेल असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भात कापणी झाल्यावर रोजगाराच्या शोधार्थ होणारे स्थलांतर आणि मग कुपोषण ही प्रशासनासाठी चिंतेची ठरलेली बाब रोखण्यासाठी २५ हजार शेतकºयांसाठी फळझाडे लागवड, हरभरा, चवळी आदी उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे सांगितले. तसेच मनरेगा व इतर योजनांच्या साहय्याने रोजगार निर्मितीवर आपण भर देणार असून जिल्हा परिषद शाळातील गुणवत्ता वाढीसाठी सातारा येथे राबविलेला गुणवत्ता सुधार कार्यक्रम इथे राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व आरोग्य तपासणी नियमितपणे होण्यावर आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.घेतली समस्यांची माहितीच्जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालये, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३०६ उपकेंद्रे एवढी मोठी सशक्त आरोग्य यंत्रणा असताना इथल्या रुग्णांचा विश्वास मात्र वापी आणि सिल्वासा येथील सरकारी रुग्णालयावर जास्त असतो.च्जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे असलेले आव्हान, तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषण, पालघर नगरपरिषदेतील भ्रष्टाचार, शहरातील वाहतूक कोंडी, जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आदी जिल्ह्यात भेडसावणाºया अनेक समस्यांची माहिती जिल्हाधिकाºयांनी करून घेतली.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार