सरपंचाविरोधातील तक्रारींचे पडसाद

By Admin | Updated: May 14, 2017 22:42 IST2017-05-14T22:42:55+5:302017-05-14T22:42:55+5:30

सातपाटी गावातील रस्त्यावरील अडथळ्यासह बंधाऱ्या लगत करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे वाहनांसह नागरिकांना सुरिक्षत चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे

The resolution of complaints against Sarpanch | सरपंचाविरोधातील तक्रारींचे पडसाद

सरपंचाविरोधातील तक्रारींचे पडसाद

लोकमत न्युज नेटवर्क
पालघर : सातपाटी गावातील रस्त्यावरील अडथळ्यासह बंधाऱ्या लगत करण्यात आलेल्या अतिक्र मणामुळे वाहनांसह नागरिकांना सुरिक्षत चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. हे अडथळे दूर करण्यास अपयशी ठरलेल्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात सागरी पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार दाखल करण्याचे पडसाद ग्रामसभेत उमटले.
सातपाटी ग्रामपंचायतीची तहकूब झालेली ग्रामसभा शुक्र वारी श्रीराम मंदिरात पार पडली. ह्यावेळी सोयीसुविधांचा वानवा, रद्द करण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा, वाढत चाललेली अतिक्र मणे, अडथळे, कचरा, अस्वच्छता असे अनेक प्रश्न उपस्थित करून ग्रामसभेत आपला राग व्यक्त केला. सातपाटी गावात या सीएसआर फंडाद्वारे अथवा आपल्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ अनेक लोकांनी सिमेंटची बाकडे दिले असून ते रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याने अडथळे निर्माण होत आहे. त्यावर रात्री दारूच्या पार्ट्या रंगत असल्याच्या अनेकांच्या तक्र ारी आहेत.
सातपाटीचा धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याने घरे उध्वस्त होण्याच्या भीतीने ग्रासलेल्या अनेक महिलांनी ग्रामसभा डोक्यावर घेत तात्काळ उपाय योजना आखण्याची मागणी केली आहे. परंतु समुद्रा लगतच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या जवळ वाढणारी बेकायदेशीर झोपडपट्टी बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती राजन मेहेर ह्यांनी सभेत दिली. खाडीत उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याला लागूनच अनेक लोकांनी घरे, गोदामे बांधली असून अश्या लोकांना ग्रामपंचायतीनी ना हरकत दाखला देऊ नये अशी मागणी होत असताना नव्याने उभ्या राहणाऱ्या मार्केट मध्ये अतिक्र मण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जगदीश नाईक ह्यांनी केली. दांड्यावर उभारण्यात आलेली शौचालये सुरु केल्यास आत्मदहनाची धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसात तक्र ार दाखल करण्याची मागणीही ह्यावेळी करण्यात आली.

Web Title: The resolution of complaints against Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.