गटनेतेपदाचा शहांचा राजीनामा

By Admin | Updated: April 24, 2017 23:50 IST2017-04-24T23:50:14+5:302017-04-24T23:50:14+5:30

नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिहिर शाह यांनी आपल्यापदाचा राजिनामा मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे

Resignation of group leader | गटनेतेपदाचा शहांचा राजीनामा

गटनेतेपदाचा शहांचा राजीनामा

डहाणू: नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिहिर शाह यांनी आपल्यापदाचा राजिनामा मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याने डहाणूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ते अडीच वर्षापूर्वी डहाणू नगरपरिषदेचे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनेचा निधी आणून कोटयावधीची विकास कामे करून डहाणूला सुशोभित केले होते. त्या नंतर नगराध्यक्षाची जागा ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्या नंतर त्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रमिला पाटील विराजमान झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिहिर शाह यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली. मात्र नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी विकास कामांना खिळ लावल्याने तसेच नगराध्यक्षा मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसकडे तक्रार केली. परंतु तिच्याकडे फारसे गांभिर्याने लक्ष न दिल्याने त्यांनी हा राजीनामा दिला.
डहाणू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीला सहा महिन्याचा कालावधी राहिला असतांनाच हे नाटय घडले आहे. (वार्ताहर)

Web Title: Resignation of group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.