नागझरी नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची सुटका

By Admin | Updated: July 3, 2017 06:01 IST2017-07-03T06:01:02+5:302017-07-03T06:01:02+5:30

तालुक्यात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आला असतांना नागझरी येथील रहिवासी

A rescued youth rescued from the river Nagzari | नागझरी नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची सुटका

नागझरी नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची सुटका

विक्रमगड : तालुक्यात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आला असतांना नागझरी येथील रहिवासी अंकूश पवार हा या पाण्यातील लाकूड घेण्यासाठी पाण्यात उतरला त्यावेळी पाण्याची पातळी कमी होती. परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढला व पूर आल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. तो २ ते ३ तास या पाण्याच्या वेढात होता. घटनास्थळी गावकरी व पोलीस यंत्रणा आल्यानंतर याला गावातील लोकांकडून दोराच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व त्याची सुटका करण्यात आली.

Web Title: A rescued youth rescued from the river Nagzari