आता तक्रार नोंदवा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

By Admin | Updated: November 13, 2016 00:27 IST2016-11-13T00:27:54+5:302016-11-13T00:27:54+5:30

५०० आणि १००० रु पयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील बँका ,पेट्रोल पंप, केमिस्ट, खाजगी व शासकीय रूग्णालयांना नागरिकांना सहकार्य

Report Now to the District Collector | आता तक्रार नोंदवा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

आता तक्रार नोंदवा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

पालघर : ५०० आणि १००० रु पयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील बँका ,पेट्रोल पंप, केमिस्ट, खाजगी व शासकीय रूग्णालयांना नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना असून त्यांचे उल्लंघन कुणी केल्यास त्याची तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
या तक्र ारी नोंदवितांना संबंधित संस्था अथवा व्यक्ती यांची माहिती द्यावी. यामध्ये तालुका, गावाची माहिती असावी. तसेच तक्र ारदारांनी आपले संपर्क क्र मांक द्यावेत. नियंत्रण कक्ष क्रमांक ०२५२५ २९७४७४, पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक ०२५२५२९७००४, ९७३०८११११९. असे आहेत. ५०० व १००० च्या जुन्या नोटा बँका व पोस्टामध्ये स्वीकारल्या जाणार आहेत त्यामुळे नागरिकांनी घाई गडबडीत कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि कोणी अडवणूक किंवा फसवणूक करत असेल त्याची तक्र ार उपरोक्त नियंत्रण कक्षामध्ये नोंदवावी, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Report Now to the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.