एसपींवर गुन्हा नोंदवा, आमदार बच्चू कडू यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:40 IST2018-03-23T00:40:15+5:302018-03-23T00:40:15+5:30
कायद्याच्या भाषेत मृत्यूपूर्व जबाब हा भक्कम पुरावा मानला जात असल्याने पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.

एसपींवर गुन्हा नोंदवा, आमदार बच्चू कडू यांची मागणी
वसई : कायद्याच्या भाषेत मृत्यूपूर्व जबाब हा भक्कम पुरावा मानला जात असल्याने पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.
विरारमधील विकास झा या युवकाने १० नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत:ला पेटवून घेऊन वसई डीवायएसपी कार्यालयासमोर आत्महत्या केली होती. त्याला न्याय मिळावा यासाठी त्याचा भाऊ अमित झा अनेक महिने वरिष्ठ पोलिसांकडे पाठपुरावा करीत होता. मात्र, आपल्या भावाला न्याय मिळत नसल्याने त्यानेही २० जानेवारी २०१८ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. अमितने मृत्यूपूर्व दिलेल्या लेखी जबाबात पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
मात्र, पोलिसांनी वरिष्ठांना वाचवण्यासाठी फक्त पोलीस निरीक्षक युनुस शेख यांच्यावरच गुन्हा दाखल केला होता, अशी कडू यांची तक्रार आहे.