बिरवाडी येथे मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा

By Admin | Updated: April 15, 2016 01:07 IST2016-04-15T01:07:03+5:302016-04-15T01:07:03+5:30

बिरवाडी येथील ग्रामस्थांसह मनुभाई मेहता यांच्यासारख्या श्रद्धाळू व सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या दानशुर व्यक्तीच्या प्रयत्नाने आज पंचमुखी हनुमाान मंदिराची उभारणीसह मूर्ती

The renovation work of the Maruti temple at Birwadi | बिरवाडी येथे मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा

बिरवाडी येथे मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा

पालघर : बिरवाडी येथील ग्रामस्थांसह मनुभाई मेहता यांच्यासारख्या श्रद्धाळू व सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या दानशुर व्यक्तीच्या प्रयत्नाने आज पंचमुखी हनुमाान मंदिराची उभारणीसह मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.
पालघर-बोईसर रस्त्यावरील पडद्या-बिरवाडी येथील ग्रामस्थांमध्ये अनेक वर्षापासून छोट्याशा मंदिरातील इच्छापूर्ती पंचमुखी हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिर उभारणीची इच्छा होती.
मुंबई येथील मनुभाई मेहता या उद्योगपती व श्रद्धाळू व्यक्तींजवळ ग्रामस्थांसह वास्तूविशाद निशांत पाटील यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी खर्चाचा भार तात्काळ उचलला. त्यांना रमेश बाफना, बंदेश पाटील इ. दानशूर व्यक्तींनी आपला वाटा उचलला.
१२ एप्रिल सकाळी ८ वाजल्यापासून गणपती पूजन, गृहशांती, जलयात्रा इ. कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरूवात झाली. बुधवारी होमहवन, महाअभिषेक, भजन, किर्तनासह आज मूर्ती जागृत करणे, होमहवन, शिखर ध्वजारोहण, मूर्ती स्थापना, पूर्णाहुती होम, शृंगार दर्शन सह महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हनुमान मंदिर सार्वजनिक संस्थान बिरवाडी यांच्या सत्कार सोहळयाला तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातील टप्पूसेना उपस्थित होती. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सोहळ््याला पंचक्रोषितील भाविकांची प्रचंड उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: The renovation work of the Maruti temple at Birwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.