गणेशोत्सवानिमित्त एस.टी, रेल्वेप्रशासनाकडून दिलासा
By Admin | Updated: September 11, 2015 23:19 IST2015-09-11T23:19:08+5:302015-09-11T23:19:08+5:30
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी महामंडळाच्या वसई विरार उपप्रदेशातील सर्व आगारांनी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वेनेही
गणेशोत्सवानिमित्त एस.टी, रेल्वेप्रशासनाकडून दिलासा
वसई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी महामंडळाच्या वसई विरार उपप्रदेशातील सर्व आगारांनी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वेनेही कोकणात जाण्यासाठी विशेष ३ रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांना यंदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
वसई विरार उपप्रदेशात तसेच पालघर जिल्ह्णात राहणाऱ्या कोकणवासीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी एस.टी महामंडळ येथील आगारातून विशेष गाड्या सोडत असते. यंदाही महामंडळाने ही व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेदेखील वसईरोड-मंगलोर, वसईरोड-रत्नागिरी, वसईरोड -मडगाव अशा ३ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या वसई जंक्शनहून सोडण्यात येणार असल्यामुळे येथील कोकणवासीयांना आरक्षण मिळून त्यांचा प्रवास सुखकर होईल असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)