शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रावण दहन कराल तर अ‍ॅट्रोसिटी, श्रमिक संघर्ष संघटनेचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:26 IST

रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

- हितेंन नाईकपालघर : रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा या संघटनेने दिल्याने दसºयाला जिल्ह्यात होणारे रावण दहनाचे कार्यक्रम अडचणीत सापडले असून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या कडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागणार आहे.देशभर दसºयाला रावण आणि महिषासुर या दैत्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्याची प्रथा वर्षानुवर्षा पासून सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान, मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतात. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पेटता बाण सोडून रावणाच्या प्रतिमेचे दहनही केलेले आहे. मात्र श्रमिक संघटनेने केलेल्या मागणीने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले असून प्रशासनाला यातून मार्ग काढण्याची कसरत करावी लागणार आहे.रावण, महिषासुर ह्या दोघांचे वैश्विक ज्ञान, राजकारण, समाजकारण, संस्कृती, कला आणि विद्येवरचे प्रभुत्व हे समाजा करीत अभिमानास्पद आहे. म्हणून आदिवासी समाजाचे ते वंदनीय राजे असल्याचा अभिमान आम्हाला असताना काही असामाजिक तत्त्वांनी काही कारणास्तव त्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने रंगविल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्हा आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या असून रावण दहनाच्या प्रथेचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही. त्यामुळे ह्या बाबत जिल्हाधिकाºयांनी न्यायालयाने केलेल्या सूचनांची पडताळणी करावी अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी पत्राद्वारे केली आहे. याउपरही जर कोणी दहनाचा प्रयत्न केल्यास संघटना त्याचा तीव्र निषेध करेल आणि जे आमच्या भावना दुखावतील त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आणि १९६०च्या भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केले जातील असा इशारा देण्यात आला आहे.दोन्ही लोकांना एकत्र बोलावून सण आनंदात साजरा करण्याचा दृष्टीने ह्यातून शांततामय मार्ग काढू.- महेश सागर, तहसीलदारकायदा व सुव्यवस्था कोणी बिघडवणार नाही ह्याकडे आपली जातीने लक्ष देऊ.- किरण कबाडी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालघर

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७