शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
3
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
4
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
5
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
6
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
7
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
8
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
9
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
10
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
11
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
12
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
13
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी
14
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
15
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
16
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
17
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
18
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
19
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

वसईच्या रानगाव समुद्रकिनारी मृत अवस्थेत आढळून आला दुर्मिळ मासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 19:55 IST

भारतीय व प्रशांत महासागरा सोबत चीनच्या यांगजी नदीत आढळून येणारा फिनलेस पोरपोईज (finless porpoise) या दुर्मिळ प्रजाती वसईच्या समुद्रकिनारी प्रथमच !

आशिष राणे

भारतीय व प्रशांत महासागरासोबत चीनच्या यांगजी नदीतील गोड्या पाण्यात आढळून येणारा फिनलेस पोरपोईज ( finless porpoise ) या प्रजातीचा असलेला हा दुर्मिळ मासा चक्क कोकण किनारपट्टीवरील वसईच्या रानगाव समुद्रकिनारी मृत अवस्थेत आढळून आला आहे. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास रानगाव गावांतील स्थानिक नागरिक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना हा  मासा मृत अवस्थेत दिसून आल्याचे ग्रामस्थ श्रीरंग यांनी लोकमतला सांगितले. 

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या माशाची लांबी जवळपास ३ फुट असून त्याचं नाव फिनलेस पोरपोईज (finless porpoise) असे आहे. दरम्यान, समुद्राच्या भरतीच्या लाटेसोबत हा दुर्मिळ मासा समुद्रकिनारी आला असावा आणि त्याची पाहणी केली असता त्यावेळी या फिनलेस पोरपोईज माशाच्या शेपटीला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याचे आढळून आले.

किंबहुना भर समुद्रातील जहाजाचा जोरदार फटका या माशाला लागल्यामुळे या दुर्मिळ माशाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. अर्थात हा मासा दुर्मिळ असल्याने स्थानिकांनी संबंधित बाब मत्स्य विभाग व वसई विरार अग्निशमन दलाला कळवली असून मृत झालेला मासा समुद्रातील लाटेमुळे किनाऱ्यावर लागला होता. या दुर्मिळ असलेल्या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी रानगाव समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.

पोरपोईज ही प्रजाती आहे वसईत आढळून आलेला हा दुर्मिळ जातीचा मासा ही एक नियोफोकेना पोरपोईज परिवारामधील  प्रजाती असून यात तीन प्रकरांचे पोरपोईज आहेत. इंडो पैसिफिक ,पूर्व एशियाई आणि यांगजी फिलनेस तिघामध्ये थोडं थोडं वेगळंपण आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार